बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात ‘राज’पुत्राचा समावेश?, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मुंबई | 10 दिवसांच्या सत्तासंघर्षाने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पार ढवळून निघालं. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व शिंदे गटाच्या बंडाळीने उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला व तत्कालिन महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) कोसळलं.

महाराष्ट्रातील सत्तापालटात भाजपने (BJP) महत्त्वाची भूमिका बजावली. शिवसेनेला (Shivsena) झटका देत भाजपने कडवे शिवसैनिकही आपल्या बाजून वळवले. त्यानंतर शिवसनेला शह देण्यासाठी भाजपने मनसेला (MNS) एक खास ऑफर दिल्याचं म्हटलं जात आहे.

एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करत भाजपने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. तर सर्वसामान्य शिवसैनिक ते ठाकरे ब्रँड आमच्यासोबत आहे, असं दाखवण्यासाठी भाजप प्रयत्नशील असल्याचं वृत्त आहे. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे (Raj Thackeray) पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांना शिंदे सरकारच्या बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, भाजप आपल्या कोट्यातून एक मंत्रिपद मनसेला देण्याची शक्यता आहे. त्यात मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील (Raju Patil) यांचं नाव आघाडीवर असताना अमित ठाकरेंकडे मंत्रिपद जाणार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. तर असा कोणताही प्रस्ताव आमच्यापर्यंत आला नसल्याचा मनसेचा दावा आहे. तसेच भाजपकडून देखील याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. अमित ठाकरे आमदार किंवा विधान परिषदेचे सदस्य नसले तरी अमित ठाकरेंना मंत्रिपद दिलं तर तरूण मतदारांवर प्रभाव पडण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या-

‘मुंबई महापालिकेत राष्ट्रवादीचा झेंडा?’, शरद पवारांचं मोठं वक्तव्य

“संजय राऊतांना हटवा, घर जाळायला हेच जबाबदार”

‘…तर उद्धव ठाकरेंनाच मुख्यमंत्री करण्याची वेळ राज्यपालांवर येईल’, राष्ट्रवादीच्या नेत्याचा मोठा दावा

मोठी बातमी! पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर कलम 144 लागू

“ज्या ताटात जेवलात त्यातच थुंकायचं हे कुठून शिकलात?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More