बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

संप मिटण्याची शक्यता! कर्मचारी आणि सरकारमध्ये चर्चेस पुन्हा सुरूवात

मुंबई | आपल्या मागण्यांसाठी राज्याची लालपरी सांभाळणारे हात संपावर आहेत. सरकार (Government) आणि कर्मचारी (Employee) यांच्यात अजूनही तोडगा निघत नसल्याचंच सध्यातरी चित्र आहे. सरकारनं कर्मचाऱ्यांना 41 (Salary increase) टक्के पगारवाढ देऊनही कर्मचारी संप मागं घेण्यासाठी तयार नाहीत. परिणामी अजून किती दिवस राज्यातील वाहतूक बंद राहणार हा प्रश्न सध्या सर्वांना पडला आहे.

परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचं आवाहन केलं होतं. तरीही कर्मचारी विलीनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम आहेत. परिणामी आता सरकार आणि कर्मचारी यांच्यात परत एकदा चर्चा सुरू झाली आहे. आता चर्चा एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यावर होत आहे.

राज्य सरकारकडून विलीनीकरणावर स्पष्ट भूमिका मांडण्यात आली आहे. न्यायालयानं नियुक्त केलेल्या समितीच्या अहवालानंतर विलीनीकरणाच्या प्रश्नावर तोडगा निघणार आहे. तत्पुर्वी सध्या राज्यातील सर्वच घटकांना एसटी बंदचा मोठा फटका बसत असल्यानं हा संप मिटवण्यासाठी सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत.

दरम्यान, राज्याच्या सार्वजनिक वाहतूकीचा कणा असलेली लालपरी सध्या आगारात धुळखात उभी असल्यानं राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. राज्याच्या ग्रामीण भागात शाळा सुरू असल्या तरी शाळांमध्ये जाण्यासाठी सध्या वाहतूकीची मोठी समस्या निर्माण झाली आहे.

थोडक्यात बातम्या 

“जेव्हा मुंबईत हल्ला झाला तेव्हा राहुल गांधी पार्टी करत होते”

“23 वर्षात नवसाच्या इतक्या कोंबड्या जमल्या की आता…”

मोठी बातमी! शिवसेनेच्या ‘या’ बड्या नेत्यावर ईडीची कारवाई

अण्णा हजारे यांच्या तब्येतीबाबत ‘ही’ महत्त्वाची माहिती आली समोर

नारायण राणेंच्या भविष्यवाणीची नाना पटोलेंकडून खिल्ली, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More