बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता; महाराष्ट्रातून कोणाची वर्णी लागणार?

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांच्या मॅरेथॉन बैठकीनंतर केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. कोरोना संकटातून देश हळूहळू बाहेर पडत असताना केंद्रीय मंत्रिमंडळातील विस्तार करण्यासाठी ही योग्य वेळ असल्याचं राजकीय विश्लेषकांनी स्पष्ट केलं आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळात भाजपमध्ये मागच्या वर्षी सामील झालेले ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह आसाममधील माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार यांची केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळात विविध कारणांमुळे अनेक मंत्रिपदं रिक्त झाली आहेत. केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचं निधन त्याचबरोबर शिवसेना व अकाली दल हे मित्र पक्ष सरकारमधून बाहेर पडल्याने मंत्री पदं रिक्त आहेत आणि कोरोनाकाळात सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका झाली असताना सरकारची प्रतिमा काही प्रमाणात सकारात्मक करण्यासाठी आणि बदल घडवून आणण्यासाठी मंत्रिमंडळ विस्ताराची गरज असल्याचं बोललं जात आहे.

महाराष्ट्रातून शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी राजीनामा दिला आणि त्यांच्या मंत्रिपदाचा अतिरिक्त कार्यभार केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यावर देण्यात आला त्यानंतर आता महाराष्ट्राचे भाजपचे नेते व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे आता केंद्रीय मंत्रिमंडळात नेमके काय फेरबदल होतात? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या –

“संभाजीराजे छत्रपती हे मान्य करत नसले तरी ऑन पेपर ते भाजपचेच खासदार”

‘या’ एका व्यक्तीनं तयार केली मॅच विनर्सची फौज; बदलली आहे टीम इंडिया

देशात दीड हजारांच्या जवळपास डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू; मृतांमध्ये इंटर्न डॉक्टरांचाही समावेश

“मोदी सरकारमुळेच मुंबई तुंबली अन् हिंदमाता येथे पाणी साचलंय त्याला स्मृती इराणी जबाबदार”

चिंता वाढली! ‘या’ जिल्ह्यात एका दिवसात तब्बल 24 कोरोनाबाधितांचा मृत्यू

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More