बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“देवेंद्रजींनी सांगितलं म्हणून काही ट्विट डिलीट केल्या, नाहीतर मी कोणाच्या बापाला…”

मुंबई | राज्याच्या राजकारणात सध्या भाजप आणि महाविकास आघाडीत जोरदार वाद होताना दिसत आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची राजकारणात असो किंवा समाजकारणात जोरदार चर्चा असते.

अमृता फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर सातत्यानं आपल्या पोस्टच्या माध्यमातून टीका केली आहे. फडणवीस यांच्या पत्नी असल्यानं नाही तर एक नागरिक म्हणून देखील मी बोलत असते, असं अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत.

अमृता फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस माझा महाकट्ट्यावर बोलते झाले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी अमृता फडणवीस यांनी राजकीय पोस्ट करू नयेत असं म्हटलं आहे. अमृता फडणवीस यांनी देखील फडणवीस यांच्या वक्तव्याला जोडून एक वक्तव्य केलं आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी सांगतिलं म्हणून एखादी पोस्ट डिलीट केली असेल. नाहीतर मी कुणाच्या बापाला घाबरत नाही, असं अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत. अमृता फडणवीस यांच्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा आहे.

थोडक्यात बातम्या – 

क्रिकेट जगतात खळबळ! जडेजानं दिला कर्णधारपदाचा राजीनामा

“शरद पवार मुख्यमंत्री, विलासराव पत्र घेऊन आले अन्…”, सुशिलकुमार शिंदेंनी सांगितली इनसाईड स्टोरी

भाजपचा ‘हा’ बडा नेता अडचणीत; अटकेची टांगती तलवार कायम

इम्तियाज जलील म्हणतात, “मला आता हालचालींवर लक्ष द्यावं लागेल”

“एक लांडगा महाराष्ट्राच्या कळपात घुसलाय”; पडळकरांची शरद पवारांवर जोरदार टीका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More