चिंचवड | लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर चिंचवडची पोटनिवडणूक जाहीर झाली. त्यामुळे भाजपकडून लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र बंडखोरी करत शिवसेनेचे नेते असलेले राहुल कलाटे (Rahul Kalate) यांनी अपक्ष म्हणू नअर्ज दाखल केला.
राहुल कलाटे (Rahul Kalate) यांनी मैदानात उडी घेतल्यानं महाविकास आघाडीच्या (MVA) उमेदवारासमोर मोठं आव्हान उभ राहिलं आहे. राहुल कलाटे यांनी निवडणुकीतून माघार घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे चिंचवडची पोटनिवडणूक ही तिरंगी होणार असल्याचं स्पष्ट झालं होतं.
स्वत: उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) राहुल कलाटे यांनी माघार घ्यावी यासाठी त्यांच्याशी फोनवरुन चर्चा केली होती. मात्र तरीही राहुल कलाटे हे निवडणुकीच्या रिंगणातून मागे हटले नाहीत.
राहुल कलाटेंच्या बंडखोरीनंतर शिवसैनिकांकडूनच कलाटे यांना विरोध होत असल्याचं पहायला मिळत आहे. सोशल मीडियावर देखील राहुल कलाटेंना विरोध दर्शवला जात आहे.
सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. यात शिवसैनिकांनो राहुल कलाटे या गद्दाराविरोधात इतक्या जोरात काम करायचं आहे की बाकी गद्दरांना निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी धडकी भरली पाहिजे, असं म्हणत शिवसैनिकांकडून कलाटेंसह बंडखोरांना इशारा देण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-