बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पोस्टाची भन्नाट योजना; सुरक्षित गुंतवणुकीच्या विचारात असाल तर आत्ताच गुंतवा पैसे

नवी दिल्ली | आपल्या देशात गुंतवणूक (Investment) करण्यासाठी एक विश्वासार्ह पर्याय म्हणून पोस्टाच्या (Indian Post) योजनांकडे पाहिलं जातं. पोस्टाच्या अशा अनेक योजना आहेत ज्यात सुरक्षित गुंतवणुकीसह योजनेची मुदत संपल्यानंतर चांगला परतावा देखील मिळतो.

पोस्टाची मंथली इनकम योजना (Monthly Income Scheme) देखील अशीच आहे. पोस्टाच्या या योजनेत सध्या गुंतवणुकीवर वार्षिक आधारावर 6.6 टक्के व्याजदर आहे. मंथली इनकम योजनेअंतर्गत तुमच्या खात्यात दर महिन्याला व्याज जमा होतं. तर 1 एप्रिल 2022 पासून यात कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत.

या योजनेत तुम्ही अगदी 1 हजार रूपयांपासून ते 4.5 लाखांपर्यंत गुंतवणूक करू शकता. जर तुमचे जॉईंट अकाउंट असेल तर तुम्ही 9 लाखांपर्यंतची गुंतवणूक देखील करू शकता.जर तुमचे जॉईंट अकाउंट असेल तर दोन्ही खातेदारांचा या रकमेवर समसमान हक्क आहे. मंथली इनकम योजनेत तुम्हाला हजार रूपयांच्या पटीत गुंतवणूक करता येऊ शकते.

दरम्यान, प्रौढ भारतीय व्यक्तींसह अल्पवयीन मुलं देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात. ज्यांचं वय 10 वर्षांपेक्षा जास्त आहे ते मंथली इनकम योजनेत गुंतवणूक करू शकतात. अल्पवयीन मुलांना त्यांच्या पालकांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेत गुंतवणूक करता येऊ शकते.

थोडक्यात बातम्या-

“राजकारण सोडून हिमालयात जायची संधी कोल्हापूरकरांनी दिली होती, पण…”

“कपड्यांचे रंग बदलून कधीही हिंदुत्त्व येत नाही, ते तर…”

‘… तर आमचेही हात बांधलेले नाहीत’, राज ठाकरेंचा थेट इशारा

“अरं…मला बी तमाशाला बोलवा”, अजितदादांच्या वक्तव्याने एकच हशा पिकला

…अन् हलगीच्या तालावर अमोल कोल्हेंनी धरला ठेका; व्हिडीओ तुफान व्हायरल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More