बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पोस्टाची भन्नाट योजना; बँकेपेक्षा मिळेल अधिक परतावा

नवी दिल्ली | अधिक परताव्याच्या अपेक्षेने गुंतवणूक करण्याच्या विचारात असाल तर पोस्टाची ही भन्नाट योजना (Post Office’s Scheme) तुमच्यासाठीच आहे. बँकेप्रमाणेच पोस्टाच्याही अनेक स्किम आहेत ज्यात गुंतवणुकीनंतर चांगला परतावाही मिळतो.

बँकांसारखीच पोस्टाचीही ‘मुदत ठेव योजना’ (Mudat Thev Yojana) आहे. या योजनेत एक, दोन, तीन आणि पाच वर्षांसाठी गुंतवणूक करता येते. या योजनेत 1 हजार रूपयांपासून कितीही रक्कम फिक्स डिपॉसिट म्हणून गुंतवता येते. तसेच या योजनेत पैसे गुंतवण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही.

बँकेत जर एफडी (Fix Deposit) असेल तर त्यावर तुम्हाला जास्तीत जास्त 5.5 टक्क्यांपर्यंत व्याज मिळू शकतं. पण हेच पैसे जर पोस्टाच्या मुदत ठेव योजनेत गुंतवले तर त्यावर 6.7 टक्क्यांपर्यंत व्याज मिळू शकतं आणि सोबतच एफडी मुदत पूर्ण झाल्यानंतर चांगला परतावा देखील मिळतो.

पोस्टाच्या या मुदत ठेव योजनेत पैसे गुंतवले तर आयटी अॅक्ट 1961 (Income Tax Act 1961) अनुसार टॅक्समध्ये देखील सुट मिळते. या योजनेमुळे अधिक परतावा मिळतोच शिवाय बचतही होते. तुमची इच्छा असेल तर या योजनेचा कालावधीही वाढवू शकता.

थोडक्यात बातम्या-

‘मेरे उतने बिग बूब्स नही जो मे…’; नीना गुप्तांचा जुना व्हिडीओ व्हायरल

“श्रीमंत मराठ्यांनी ओबीसींना आरक्षण द्यायचं नाही असं ठरवलंंय”

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ?, वाचा आजचे ताजे दर

कोरोना चाचणी झाली आता आणखी स्वस्त; राजेश टोपेंची मोठी घोषणा

Omicron | ‘आगामी काळात आतापेक्षा जीवघेणी आणि भयानक साथ येणार’; तज्ज्ञांच्या दाव्याने खळबळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More