नवी दिल्ली | आपल्याकडे गुंतवणुक करायची असेल तर विश्वासार्ह पर्याय म्हणून पोस्टाच्या (Post Office) योजनांकडे पाहिलं जातं. भविष्याचा विचार करून गुंतवणुक करायची असेल पोस्टाच्या अशा अनेक योजना उपलब्ध आहेत ज्यातून चांगला रिटर्न देखील मिळतो.
पैसे बचतीसाठी पोस्टाची रिकरिंग डिपॉझिट (RD) योजनेकडे एक सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून पाहिलं जातं. पोस्टाच्या RD योजनेअंतर्गत तुम्ही दरमहा फक्त 100 रूपयांपासून गुंतवणुकीला सुरूवात करू शकता. यावर सध्या 5.8 टक्के वार्षिक व्याज देखील उपलब्ध आहे.
या योजनेत तुम्हाला हवी तितकी खाती उघडता येतात. पोस्टाच्या RD योजनेत कोणतीही प्रौढ व्यक्ती आपले खाते उघडू शकते. तर अल्पवयीन मुलांच्यावतीने त्यांचे पालक खाते उघडू शकतात. तर या योजनेत संयुक्त खाते देखील उघडता येतात.
दरम्यान, या योजनेत तुम्हाला दर महिन्याला 100 रूपये भरावे लागतात. या योजनेअंतर्गत तुमचे 12 हफ्ते जमा केले जातात. या रकमेच्या अंतर्गत तुम्ही कर्ज देखील घेऊ शकता. तुमच्या खात्यात जमा केलेल्या रकमेच्या 50 टक्के कर्ज घेतले जाऊ शकते.
थोडक्यात बातम्या-
‘अस्वस्थ, अशांत, अतृप्त आत्मे’, शरद पवारांवरील हल्ल्यानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया
कार्डशिवायही काढता येणार एटीएममधून पैसे, आरबीआयने केली मोठी घोषणा
“कर्म याच जन्मात फेडावे लागतात, यातून कोणीच वाचत नाही”
मोठी बातमी! किरीट सोमय्यांना मुंबई पोलिसांचा झटका
मुंबईत पेट्रोल-डिझेलचा उच्चांक, वाचा ताजे दर
Comments are closed.