Post Office Scheme | भारतात (India) फार आधीपासून सुरक्षित गुंतवणुकीला (Safe Investment) महत्त्व दिले जात आहे. म्हणूनच देशातील बहुतांशी लोक पोस्ट ऑफिस योजनांमध्ये (Post Office Scheme) गुंतवणूक करतात. पोस्ट ऑफिसकडूनही (Post Office) देशातील नागरिकांसाठी विविध प्रकारच्या बचत योजना (Saving Schemes) सुरू करण्यात आल्या आहेत. पोस्टाच्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक केल्याने सुरक्षितता (Safety) आणि परतावा (Return) दोन्ही मिळतात. जर तुम्ही यात गुंतवणूक करण्याची तयारी करत असाल तर तुम्हाला बरेच सारे गुंतवणुकीचे पर्याय मिळणार आहेत. दरम्यान आज आपण पोस्ट ऑफिसकडून चालवल्या जाणाऱ्या अशाच एका लोकप्रिय योजनेची माहिती पाहणार आहोत.
खरंतर, पोस्टात सुकन्या समृद्धी योजनेपासून (Sukanya Samriddhi Yojana) ते पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट स्कीमपर्यंत (Post Office Time Deposit Scheme) तुम्ही बऱ्याच योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता. पण आज आपण यातील सर्वाधिक लोकप्रिय अशा सुकन्या समृद्धी योजनेची माहिती जाणून घेणार आहोत. या योजनेत गुंतवणूकदार किमान एक हजार रुपयांची गुंतवणूक करून तब्बल पाच लाख रुपयांहून अधिकचा परतावा मिळवू शकतात. मंडळी ही योजना 2015 मध्ये सुरू झाली. यामध्ये जर गुंतवणूकदारांनी दरमहा 1000 रुपयांची गुंतवणूक केली म्हणजेच एका वर्षात बारा हजार रुपये गुंतवले तर गुंतवणूकदारांना पाच लाखांहून अधिकचा परतावा मिळतो.
अशा परिस्थितीत आज आपण पोस्टाच्या या योजनेतून गुंतवणूकदारांना हजार रुपयांची गुंतवणूक करून कशा पद्धतीने पाच लाखांहून अधिकचा परतावा मिळणार आहे, या योजनेसाठी सध्याचे व्याजदर (Interest Rate) काय आहेत, याचाच आढावा घेणार आहोत.
कसे मिळणार 5 लाखांहून अधिकचा परतावा?
समजा तुम्ही दरमहा सुकन्या समृद्धी योजनेत 1000 रुपये गुंतवणूक करत आहात, म्हणजेच जर तुम्ही 12 महिन्यांत एकूण 12000 रुपये गुंतवणूक करत असाल तर 15 वर्षानंतर (5 वर्षांचा लॉक इन कालावधी गृहित धरून, हा कालावधी कमी जास्त असू शकतो, योजनेच्या अटी आणि शर्तीनुसार बदल घडू शकतात.) गुंतवणूक केलेली एकूण रक्कम 1,80,000 रुपये असेल. यामध्ये, तुम्हाला दरवर्षी 8.2% दराने व्याज मिळेल आणि या व्याजाची एकूण रक्कम 3 लाख 74 हजार रुपये असेल. म्हणजेच सुकन्या समृद्धी योजनेत प्रतिमहा एक हजार रुपयांची गुंतवणूक केल्यास 15 वर्षानंतर तुम्हाला एकूण 5,54,206 रुपये मिळणार आहेत. (Post Office Scheme)
या योजनेच्या काही खास गोष्टी
सुकन्या समृद्धी योजना ही भारत सरकारने (Indian Government) सुरू केलेली महत्त्वाकांक्षी बचत योजना आहे. ही योजना फक्त आणि फक्त मुलींसाठी (Girls) आहे. मुलींचे आर्थिक भविष्य (Financial Future) चांगले बनवण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. महिला सक्षमीकरणाचा (Women Empowerment) विचार करून आणि स्त्रीभ्रूणहत्या (Female Foeticide) सारख्या समस्या लक्षात घेऊन पंतप्रधान मोदींनी (PM Modi) ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला होता, जेणेकरून पालकांना (Parents) लहान वयातच आपल्या मुलीसाठी बचत (Saving) सुरू करण्यास प्रोत्साहित केले जाऊ शकते.
या योजनेत सरकारकडून सुमारे 8.2 टक्के दराने व्याज मिळते. हे खाते मुलीच्या जन्माच्या वेळी किंवा 10 वर्षांच्या वयापर्यंत उघडले जाऊ शकते. या योजनेत तुम्ही किमान 250 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा करू शकता.
थोडक्यात, सुकन्या समृद्धी योजना ही मुलींच्या भविष्यासाठी एक उत्तम गुंतवणूक योजना असून, यामध्ये कमी गुंतवणुकीतूनही चांगला परतावा मिळवता येतो. (Post Office Scheme)
Title : Post Office Scheme Sukanya Samriddhi Yojana Get Over 5 Lakh Return On Monthly Investment Of 1000