Post Office | भारतीय पोस्ट ऑफिस (Post Office) नेहमीच आकर्षक व्याजदरासह नवीन-नवीन स्कीम आणत असते. आता अशीच एक नवीन स्कीम पोस्ट ऑफिसने काढली आहे. ज्यामुळे तुमची भविष्याची चिंता दूर होईल. बरेच जण पुढे काही अडचण आल्यास इतरांपुढे हात पसरायची वेळ येऊ नये म्हणून गुंतवणूक करत असतात.
त्यात म्हातारपणी तर काही जणांचे प्रचंड हाल होतात. आता पोस्ट ऑफिसने वृद्ध व्यक्तींसाठी एक जबरदस्त स्कीम आणली आहे. या योजनेत तुम्हाला बंपर परतावा मिळेल. पोस्ट ऑफिसच्या सीनियर सिटीजन सेविंग स्कीममध्ये तुम्ही किमान 1000 रुपयांच्या गुंतवणुकीपासून सुरुवात करू शकता. त्याची कमाल मर्यादा 30 लाख रुपयांपर्यंत असून, तुम्ही तुमच्या स्वतःच्या इच्छेनुसार या योजनेत गुंतवणूक करू शकता.
Senior Citizens Savings Scheme-
बऱ्याचदा खासगी नोकरी करणाऱ्यांना पेन्शनचा आधार नसल्यामुळे वृद्धापकाळाची चिंता सतावत असते. अशावेळी तुम्ही जर पेन्शन मिळवण्यासाठी एखाद्या योजनेत गुंतवणूक करणार असाल तर, पोस्ट ऑफिसची एक योजना आहे जी तुम्हाला मोठा फायदा करून देईल.
या योजनेत तुम्ही गुंतवणूक केल्यास भविष्यात तुम्हाला दर महिन्याला निश्चित रक्कम मिळू शकते. या पोस्ट ऑफिस योजनेचे नाव सीनियर सिटीजन सेविंग स्कीम आहे. या योजनेद्वारे तुम्हाला दरमहा 20,500 रुपये मिळतील, ज्याचा कालावधी हा 5 वर्षे आहे. यासोबतच योजनेत तुम्हाला दरमहा एक निश्चित उत्पन्न देखील (Post Office) मिळेल. या योजनेबद्दल अधिक माहिती खाली दिली आहे.
सीनियर सिटीजन सेविंग स्कीम बचत योजना ही 60 वर्षे वयाच्या लोकांसाठी आहे आणि ज्यांनी VRS घेतले आहे ते देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात. यामध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला वार्षिक 8.2 टक्के व्याज मिळेल. या योजनेअंतर्गत 15 लाख रुपये जमा करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक तिमाहीत 10,250 रुपये मिळतील.
महिन्याला मिळतील 20,500 रुपये
या योजनेअंतर्गत 5 वर्षात तुम्हाला फक्त व्याजातून 2 लाख रुपये नफा मिळेल आणि जर तुम्ही तुमची सेवानिवृत्तीनंतरची सुमारे 30 लाख रुपयांची कमाई त्यात गुंतवली तर तुम्हाला दरवर्षी 2,46,000 रुपये व्याज मिळेल. याचा अर्थ तुम्हाला दरमहा 20,500 रुपये आणि प्रत्येक तिमाहीत 61,500 रुपये मिळतील.
पोस्ट ऑफिसच्या सीनियर सिटिझन सेव्हिंग स्कीममध्ये (Post Office) तुम्ही 1000 रुपयांच्या किमान गुंतवणुकीपासून सुरुवात करू शकता. त्याची कमाल मर्यादा 30 लाख रुपयांपर्यंत असून, तुम्ही तुमच्या स्वतःच्या इच्छेनुसार या योजनेत गुंतवणूक करू शकता.
News Title – Post Office Senior Citizens Savings Scheme
महत्त्वाच्या बातम्या-
टेनिसस्टार सानिया मिर्झा दुसऱ्यांदा लग्न करणार; सोशल मीडियावर पोसट व्हायरल
सानिया मिर्झाचा एक्स नवरा शोएब मलिकने केली मोठी घोषणा; म्हणाला, “पुन्हा एकदा..”
अमिताभ बच्चन यांचे सून ऐश्वर्याशी अजूनही पटत नाही?; ‘त्या’ पोस्टमुळे चर्चेला उधाण