बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पोस्टाच्या ‘या’ योजनांमध्ये गुंतवणूक करा आणि मिळवा दुप्पट पैसे; जाणून घ्या अधिक माहिती

मुंबई | पोस्ट ऑफिस नेहमीच सामान्य नागरिकांच्या हिताचे निर्णय घेत असतं. आपल्या कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून ग्राहकांना थेट आर्थिक फायदा मिळवून देणं हे पोस्ट ऑफिसचं मुख्य लक्ष्य आहे. छोट्या गुंतवणूकीच्या माध्यमातून मोठा आर्थिक लाभ मिळत असतो. अशाच पोस्ट ऑफिसच्या काही महत्वाच्या योजना आहेत.

आपण कमवलेला पैसा हा सुरक्षित रहावा असं सर्वांना वाटतं. त्या पैशांचा फायदा आपल्याला किंवा आपल्या परिवाराला व्हावा असाच विचार सर्वजण करत असतात. सुकन्या समृद्धी योजना ही खास मुलींसाठी राबवली जाते. 7.6 टक्के व्याजदराने ही तुमची रक्कम 9.47 वर्षात दुप्पट होत असते. जेष्ठ नागरिक सुविधा या योजनेत तुम्हाला 7.4 दराने व्याज मिळेल ज्यात तुमची रक्कम ही 9.73 वर्षात दुप्पट होईल.

पोस्ट ऑफिसच्या बचत खात्यावर रक्कम ठेवाल तर तुम्हाला 4 टक्के व्याजदर मिळतो. तुमची रक्कम ही 18 वर्षात दुप्पट होईल. पीपीएफ योजनेमध्ये तुम्हाला 7.1 टक्के दराने व्याज मिळतं. यात तुमचे पैसे 10.14 वर्षात दुप्पट होऊन तुम्हाला फायदा होत असतो. महिनावारी उत्पन्न योजनामध्ये तुम्ही 6.6 टक्के दराने 10.91 वर्षात रक्कम दुप्पट होईल.

आरडीमध्ये तुम्हाला 5.8 व्याज दराने 10.41 वर्षात रक्कम दुप्पट होईल. टाइम डिपाॅझीट योजना तुम्ही 1 ते 3 वर्षासाठी करत असाल 5.5 टक्के व्याजदर आणि 5 वर्षांसाठी करत असाल तर 6.7 टक्के व्याजदर मिळेल. नॅशनल सेव्हींग सर्टीफिकेट ही 6.8 टक्के व्याजदराने 5 वर्षीय योजना आहे. अशा या योजना आहेत.

थोडक्यात बातम्या

कोरोनामुळे यंदाही गणेशोत्सव साधेपणानंच; भाविकांसाठी ऑनलाईन दर्शनाची होणार सोय

‘लोकशाहीच्या मंदिरात मार्शल लाॅ लावलाय’; राज्यसभेतील गदारोळानंतर राऊतांची टीका

‘मुख्यमंत्री तुम्हाला लाज वाटली पाहिजे’; महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

संभाजीराजेंना बोलू न दिल्यानं संजय राऊत भडकले, पाहा व्हिडीओ

“मराठा समाजाला आरक्षण द्यायचंय की नाही ते सांगा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More