…तर भाजपचे ‘हे’ मंत्री लोकसभेच्या रिंगणात उतरणार?

…तर भाजपचे ‘हे’ मंत्री लोकसभेच्या रिंगणात उतरणार?

मुंबई | लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना भाजप-सेनेच्या युतीचा निर्णय आणखी तळ्यात मळ्यातच आहे. भाजपने दिग्गज मंत्र्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याची तयारी ठेवली आहे.

मुंबईमधून शिक्षण मंत्री विनोद तावडे, कोल्हापूरमधून महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, माढामधून सहकार मंत्री सुभाष देशमुख आणि कल्याणमधून राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. 

युती झाली नाही तर निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना खासदार कृपाल तुमाने आणि अन्य काही खासदारांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याची तयारी भाजपने केली आहे. 

दरम्यान, लोकसभा निवडणूक घोषित होण्यास थोडा काळ राहिला असला तरीही भाजप-सेनेच्या युतीबाबतच्या काहीच हालचाली दिसत नाहीत.

महत्वाच्या बातम्या-

काँग्रेसचे ‘हे’ चार आमदार राजीनामा देणार?

-“आ देखे जरा किसमे कितना है दम”; ज्योतिरादित्य शिंदेंचं भाजपला आव्हान

नरेंद्र मोदींना तुरुंगात टाकलं पाहिजे- राहुल गांधी

निवडणूकीआधी 5 कोटी घरांवर पक्षाचा झेंडा फडकवण्याचा भाजपचा संकल्प

-मोदींनीच अनिल अंबानींना राफेल कराराची माहिती दिली- राहुल गांधी

Google+ Linkedin