नवी दिल्ली | कमी जोखमीसह अनेकजण गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करतात. बँकेप्रमाणेच पोस्टानेही अनेक योजना ग्राहकांना ऑफर केल्या आहेत. तुम्ही जर गुंतवणूक करण्याचा विचार विचार करत असाल तर ही योजना तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. पोस्टाकडून आता ग्राम सुमंगल ग्रामीण डाक जीवन बीमा या योजना सादर करण्यात आली आहे. या योजनेचे खास वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला फक्त 95 रूपये गुंतवावे लागणार आहेत.
या योजनेच्या माध्यमातून रोज 95 रूपये गुंतवल्यास मॅच्युरिटीवर 14 लाख रूपयांचा लाभ मिळू शकतो. सदर योजनेमध्ये 19 ते 45 वयोमर्यादेपर्यंत गुंतवणूक करता येते. तुम्ही ही पॉलिसी 15 किंवा 20 वर्षांसाठी खरेदी करू शकता. जर आपल्याला वयाच्या 40 व्या वर्षी पॉलिसीची गुंतवणुक केली तर त्याची मॅच्युरिटी 20 वर्षांनी 60 वर्षे होईल. जर वयाच्या 45 व्या वर्षी पॉलिसी खरेदी केली तर 15 वर्षे गुंतवणूक करण्याची संधी मिळू शकणार आहे.
जर तुम्ही 15 वर्षाची पॉलिसी निवडली असेल तर तुम्हाला 6, 9 आणि 12 वर्षांसाठीच्या योजनेत 20 टक्के पैसे परत मिळतील. भारतीय नागरिक वय वर्षे 25 असल्यास 7 लाखांच्या गुंतवणुकीसह 20 वर्षांकरिता ही पॉलिसी खरेदी करू शकतो. या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी प्रत्येक महिन्याला 2850 रूपये भरावे लागणार आहेत.
दरम्यान, आपल्याला तीन महिन्यांसाठी 8850 रूपये तर सहा महिन्यांकरिता 17100 रूपये जमा करावे लागतील. वयाच्या 45 व्या वर्षी आपणांस 14 लाख रूपयांचा पूर्ण लाभ मिळेल. त्यामुळे अनेकजण पोस्टाच्या ग्राम सुमंगल ग्रामीण डाक जीवन बीमा या योजनेकडे गुंतवणुकीच्या दृष्टीने पाहत आहेत.
थोडक्यात बातम्या-
“परमेश्वरानं मला दूरदृष्टी दिली अन् मी भाजपमध्ये आलो”
मोठी बातमी! फोन टॅपिंग प्रकरणी देवेंद्र फडणवीसांना नोटीस
“माझी आई माझ्या घरी राहते, मी कॅमेरावाल्यांना घेऊन आईला भेटत नाही”
“‘सामना’कार रशिया आणि युक्रेनमध्ये मध्यस्थी साठी रवाना, झुकेगा नहीं साला”
“सेक्सी आणि हॉट म्हणून ओळखलं जाणं मला आवडतं”
Comments are closed.