बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पोस्टरबाजी: “नितेश राणे हरवला आहे, शोधून देणाऱ्यास एक कोंबडी बक्षीस”

मुंबई | राज्यात भाजप आमदार नितेश राणे (Nitesh rane) यांच्यावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पहायला मिळत आहे. संतोष परब हल्ला प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयानं काल अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांच्या अडचणी वाढ झालेली पहायला मिळत आहे. अशातच आता नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवार अद्यापही कायम आहे. कोणत्याही क्षणी नितेश राणेंना अटक होऊ शकते.

नितेश राणेंविरोधात आता पोस्टरबाजी करण्यात येत आहे. त्या बॅनरवर नितेश राणे यांचा एक फोटो असून ते हरवले असल्याची माहिती लिहिण्यात आली आहे. तसेच त्यांना शोधून काढणाऱ्या व्यक्तीला कोंबडी बक्षीस देण्यात येईल, असं म्हटलं आहे. सध्या याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हे बॅनर कोणी लावले आहे, याबाबत काहीही उल्लेख करण्यात आलेला नाही. मात्र याचे फोटो तुफान व्हायरल होत असून विरोधकांकडून राणेंवर जोरदार निशाणा साधला जात आहे. तर काही ठिकाणी नितेश राणेंचं समर्थनही करण्यात येत आहे.

दरम्यान, भाजप आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. दोन दिवस चाललेल्या युक्तिवादानंतर काल जिल्हा सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एस व्ही हांडे यांनी अटकपूर्व जामीन नाकारला.

थोडक्यात बातम्या – 

‘भाषेऐवजी भावना आणि शब्दांऐवजी संवेदना समजून घ्या’; रोहित पवारांची MPSCला विनंती

मोठा झटका! Quinton de Kockची अचानकपणे कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती

MARD Doctor Strike: कोरोनाचं सावट घोंगावत असताना डाॅक्टरांचा आजपासून संप

गोव्यात राडा: ‘या’ स्टार खेळाडूच्या पुतळ्यावरुन नवा वाद

Corona: राज्यात नवीन नियमावली जाहीर, ‘हे’ असणार नवे नियम

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More