बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘काम कोणाचं आणि नाचतंय कोण? कधीतरी खरं बोला’; दोन राजेंमध्ये पोस्टर’वाॅर’

सातारा | आगामी काळात सातारा नगरपालिका निवडणूक लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता निवडणुकाच्या आधीच साताऱ्यात राजकारण तापल्याचं चित्र आहे.  खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यात विकास कामांवरून साताऱ्यात पोस्टरबाजी रंगलेली दिसत आहे.

सातारा नगरपालिका निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर उदयनराजे भोसले अनेक विकासकामांचा शुभारंभ करत आहेत. येणारी निवडणूक उदयनराजे आणि शिवेंद्रराजे एकत्र लढणार नसल्याचं दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच उदयनराजे यांनी स्वबळावर लढण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे दोन्हीही राजे भाजपमध्ये असून देखील वाद पहायला मिळतोय.

उदयनराजे यांच्या हस्ते पोवई नाका आणि वाढे फाटा या रस्त्याचा शुभारंभ करण्यात आला होता. त्यानंतर त्याठिकाणी उदयनराजेंचा बॅनर लावण्यात आला होता. आता त्याच बॅनरच्या शेजारी शिवेंद्रराजे भोसले यांच्या नगरविकास आघाडीकडून दुसरा बॅनर लावण्यात आला आहे. या बॅनरमध्ये काम कोणाचं नाचतय कोण, कधीतरी खरं बोला, असा निशाणा पोस्टरमधून साधण्यात आला आहे.

दरम्यान, सातारा विकास आघाडी केवळ आश्वासन देत नाही तर शब्द देतो आणि आम्ही तो पाळतो, असं म्हणत उदयनराजे यांनी शिवेंद्रराजे यांना टोला लगावला होता. त्यानंतर आता शिवेंद्रराजे यांनी उदयनराजेंवर टीका केली आहे.

थोडक्यात बातम्या-

‘तुम्ही माझ्या पाया नका पडू, मीच तुमच्या पडतो’; ‘या’ मराठमोळ्या कलाकारासमोर झुकले महानायक!

महिला सुरक्षेबाबत नाना पटोलेंचं मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र; केली ‘ही’ मोठी मागणी

“प्रभू श्रीराम एक महापुरूष होते हे मी मानत नाही”; माजी मुख्यमंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य!

भारताच्या इशाऱ्यानंतर ब्रिटनचा यु-टर्न; भारतीय नागरिकांना मोठा दिलासा

”आपलं कातडीबचाऊ समर्थन शिवरायांच्या महाराष्ट्रास साजेसं नाही”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More