नरेंद्र मोदींचा बाळासाहेब ठाकरेंना वाकून नमस्कार; मुंबईतील ‘ते’ पोस्टर चर्चेत

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज मुंबई (Mumbai) दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी पंतप्रधान (Pm) नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईतील अनेक विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन करण्यात येणार आहे.

शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Goverment) स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच नरेंद्र मोदी मुंबईत येणार आहेत. मुंबईत या सभेची जोरदार तयारी करण्यात आली आहे.

मुंबईत शिंदे गट आणि भाजपकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी, बाळासाहेब ठाकरे यांचे मोठमोठे बॅनर्स आणि कटआऊट्स लावण्यात आले आहेत.

संपूर्ण मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बॅनर्स आणि कटआऊट्सने झळकली असून गोरेगावमधीस एका बॅनरने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

या पोस्टरमध्ये बाळासाहेबांच्या पुढे नरेंद्र मोदी हे झुकले आहेत असं दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे आता या नव्या पोस्टरमुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या पोस्टरमुळे राजकीय चर्चा रंगू लागली आहे. या पोस्टरनंतर बाळसाहेबांसमोर सगळे झुकले अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More