Top News पुणे महाराष्ट्र

मराठा आरक्षणाचा निकाल लागेपर्यंत पोलीस भरतीला स्थगिती द्या; संभाजी ब्रिगेडची मागणी

पुणे | सर्वोच्च न्यायालयाने सध्या मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. जोपर्यंत मराठा आरक्षणाचा निर्णय लागत नाही तोपर्यंत सरकारने पोलिस भरतीलाही स्थगिती द्यावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेड पिंपरी-चिंचवड शहर यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राव्दारे करण्यात आली आहे.

बुधवारी 16 सप्टेंबर रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत पोलिस शिपाई भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारने पोलिस भरतीसाठी 12 हजार 538 इतक्या जागांवर भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत, असं संभाजी ब्रिगेड पिंपरी-चिंचवड शहरच्या वतीने पाठवण्यात आलेल्या निवेदन पत्रामध्ये लिहिलं आहे.

बहुसंख्य आणि मुख्य समाज असणाऱ्या मराठ्यांच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने आता होणारी पोलिस भरती थांबवावी. ही आमची मागणी सरकारने पूर्ण न केल्यास आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने या निर्णयाविरोधात राज्यभर तीव्र आंदोलन करु. त्यानंतर होणाऱ्या कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नास आपले महाविकास आघाडीचे सरकार कारणीभूत ठरेल, असा स्पष्ट इशारा शहराध्यक्ष सुधीर पुंडे यांनी त्या पत्राव्दारे दिला आहे.

दरम्यान, संभाजी ब्रिगेडनं मुख्यमंत्र्यांना पत्र धाडलं आहे, यावेळी संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष श्रीकांत काकडे, संघटक ईश्वर खंडागळे, विशाल गोरे, समाधान माने, प्रसिद्धी प्रमुख भरत सवडे इत्यादी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या-

‘राज्य सरकारने पोलीस भरतीचा घेतलेला निर्णय म्हणजे मूर्खपणा’; खासदार संभाजीराजेंची टीका

ज्येष्ठ अभिनेत्री ललिता देसाई काळाच्या पडद्याआड

‘उर्मिला मातोंडकर अभिनयासाठी नाही तर सॉफ्ट पॉर्नसाठी प्रसिद्ध’; कंगणाने उधळली मुक्ताफळं

धक्कादायक! महिलेने केला दीड वर्षाच्या बाळाला पळवण्याचा प्रयत्न

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील युवा अभिनेत्याचं निधन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या