Top News देश

कमलनाथ यांचा दर्जा परत घेण्याच्या आदेशाला स्थगिती, सर्वोच्च न्यायालय म्हणाले…

नवी दिल्ली | माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचा स्टार प्रचारकाचा दर्जा परत घेण्याच्या निवडणूक आयोगाच्या आदेशावर सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी स्थगिती दिली.

सरन्यायाधीश एस. ए. बोबडे, न्या. ए. ए. बोपन्ना आणि न्या. व्ही. रामासुब्रह्मण्यम यांच्या पीठाने निवडणूक आयोगाच्या वकिलांना सांगितले की, कमलनाथ यांची याचिका आता निरर्थक झाली आहे. कारण या जागांवर प्रचार बंद झाला आहे.

30 ऑक्टोबर रोजी कमलनाथ यांचे नाव स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळण्यात आले होते. त्यांनी आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.

निवडणूक आयोगाने आपल्या आदेशात मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याविरुद्ध त्यांच्या टिपणीचा उल्लेख केला होता. त्यांनी प्रचारादरम्यान माफियासारख्या शब्दांचा उपयोग केला होता.

महत्वाच्या बातम्या-

‘सतर्कतेने दिवाळीचं स्वागत करा’; इकबाल सिंह चहल यांचं मुंबईकरांना आवाहन

“बिहारच्या तरुणांना नोकऱ्या देण्यासाठी वेळ पडली तर मुख्यमंत्र्यांचा आणि आमदारांचा पगार कापेन”

…तर राजकारण सोडून देईन आणि हिमालयात जाईन- चंद्रकांत पाटील

‘आता तुम्हीच मार्ग काढा’; मराठा आंदोलक शरद पवारांची घेणार भेट

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता कमी आहे- राजेश टोपे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या