बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पोस्टाची बंपर योजना, आज पैसे गुंतवा 10 वर्षात 16 लाख मिळवा!

मुंबई | पोस्ट ऑफिस आपल्याला अनेक प्रकारच्या लहान बचत योजना देते. यातील एक योजना म्हणजे पोस्ट ऑफिस रिकर्निंग डिपॉझिट योजना आहे. ही योजना तुम्ही लहान बचतीसह सुरु करु शकता. हा या योजनेचा सर्वात मोठा फायदा आहे.

तुम्ही दर महिना किमान 1000 रुपये देखील यात गुंतवू शकता. तसेच पोस्ट ऑफिस रिकर्निंग डिपॉझिटमध्ये जास्तीत जास्त गुंतवणूकीस कोणतीही मर्यादा नाही. या योजनेत तुम्हाला दरमहा एक निश्चित रक्कम जमा करावी लागेल. मॅच्युरिटीच्या वेळी तुम्हाला व्याजासह संपूर्ण रक्कम मिळेल.

पोस्ट ऑफिसमधील रिकरिंग डिपॉझिट खाते हे किमान 5 वर्षांसाठी उघडता येते. त्यापेक्षा कमी कालावधीसाठी तुम्ही हे खाते उघडू शकत नाही. केंद्र सरकार दर तीन महिन्यांनी सर्व लहान बचत योजनांचे व्याज दरात सुधारणा करते. सध्या पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट वर 5.8 टक्के व्याज दर उपलब्ध आहे.

तुम्ही सध्याच्या व्याज दरावर पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिटमध्ये दरमहा 10 हजार रुपये गुंतवले, तर तुम्हाला 10 वर्षानंतर 16 लाख रुपयांहून अधिक रक्कम मिळेल. या दहा वर्षात दर महिना 10 हजार रुपयांच्या बचतीनुसार तुम्ही 12,00,000 रुपयांची बचत करु शकता.

थोडक्यात बातम्या- 

“जेवल्याशिवाय जाऊ नका”, खडसेंचा आग्रह; फडणवीस म्हणाले…

मोठी बातमी! उत्तर प्रदेशात भाजपला मोठा धक्का, “126 आमदार बंडाच्या तयारीत”

‘आयुर्वेदिक उपचार करताना एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला नाही’; भारतीय आयुर्वेद संस्थेचा दावा

“मी 39 वर्ष शिवसेनेत होतो, मराठा आरक्षणाबाबत शिवसेनेची भूमिका काय आहे हे मला माहितीये”

चिमुकल्याचं 90% फुफ्फुस खराब झालं; सिटी स्कॅन रिपोर्ट पाहून डॉक्टरही हैराण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More