बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पोस्टाची बंपर योजना, आज पैसे गुंतवा 5 वर्षात 7 लाख मिळवा!

नवी दिल्ली | पोस्ट ऑफिस आपल्याला अनेक प्रकारच्या लहान बचत योजना देते. लोक या योजना विश्वसनीय मानतात. तुम्हाला दिर्घकाळ गुंतवणूक करायची असेल तर टाईम डिपॉजिट योजना फायदेशील ठरू शकते. या योजनेमध्ये आपण 1 ते 5 वर्ष गुंतवणूक करू शकता. यामध्ये सध्या वार्षिक 6.7 टक्के दराने व्याज दिलं जात आहे.

पोस्ट ऑफिस योजनेत तुम्हाला जास्त व्याज मिळतं. 1000 रूपये देऊन तुम्ही खातं उघडू शकता. मात्र कमाल रकमेची मर्यादा यात नाही. हे खातं सिंगल एकत्रितपणे उघडलं जाऊ शकतं. जर मुलाच्या नावे खातं उघडायचं असेल तर तुम्ही ते उघडू शकता.

खाते उघडण्याच्यावेळी किंवा नंतर नामांकन करण्याची सुविधा आहे. आपत्कालीन परिस्थितीत तुम्ही मॅच्युरीटी रक्कम काढू शकता. मात्र यासाठी खात्यातून 6 महिने पूर्ण केले पाहिजेत.

दरम्यान, पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट योजना ही तुम्ही लहान बचतीसह सुरु करु शकता. हा या योजनेचा सर्वात मोठा फायदा आहे. तुम्ही दर महिना किमान 1000 रुपये देखील यात गुंतवू शकता. तसेच पोस्ट ऑफिस रिकर्निंग डिपॉझिटमध्ये जास्तीत जास्त गुंतवणूकीस कोणतीही मर्यादा नाही. या योजनेत तुम्हाला दरमहा एक निश्चित रक्कम जमा करावी लागेल. मॅच्युरिटीच्या वेळी तुम्हाला व्याजासह संपूर्ण रक्कम मिळेल.

थोडक्यात बातम्या-

“… तर त्यांचे हात-पाय तोडणार, हा महाराष्ट्र आहे…इथं राज ठाकरेंचं राज चालतं”

राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पाच्या बहिणीची पोस्ट व्हायरल, म्हणाली…

…त्यासाठी युवकांना जगाच्या एक पाऊल पुढं रहावं लागेल- नरेंद्र मोदी

‘काम हवं असेल तर निर्मात्यांना खूश करावं लागेल’; शरीरसुखाची मागणी करणाऱ्यांना मनसेचा चोप

“सत्ताधारी असो वा विरोधक, संसदेत गोंधळ घालणाऱ्या खासदारांचं दोन वर्षांसाठी निलंबन करा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More