बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“गुंडगिरी करून सत्ता काबीज करता येत नाही”

मुंबई | आजपासून विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहामध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षनेते अनेक मुद्यावरून एकमेकांवर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. एवढच नाही तर अध्यक्षांच्या दालनाबाहेर विरोधक व सत्ताधाऱ्यांमध्ये धक्काबुक्की देखील झाल्याचंही समोर आलं आहे. यावरून राज्यभरात अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत.

सत्ताधाऱ्यांनी भाजपवर पीठासीन अधिकारी भास्कर जाधव यांना घेरून धक्काबुक्की केली असल्याचा आरोप केला आहे. तसेच अनेक नेत्यांनी या घडलेल्या घटनेवर आपली प्रतिक्रियाही द्यायला सुरूवात केली आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी देखील विरोधी पक्ष भाजपवर हल्ला केला आहे.

पीठासीन अधिकारी भास्कर जाधव जे काम करत होते. त्यांना जाऊन सगळ्यांनी घेरलं. त्यांच्याशी धक्काबुक्की केली आणि 15 मिनिटं शिवीगाळ करत होते. तसेच विरोधी पक्षांच्या नेत्यांनी धक्काबुक्कीही केली. अशी घटना महाराष्ट्राच्या इतिहासात कधी घडलेली नसल्याचं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. अधिवेशनाचा पहिला दिवस संपल्यानंतर सभागृहाच्या बाहेर आल्यावर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

दुःख हे आहे की हा सगळा प्रकार घडत असताना याचा पुढाकार या राज्याचे विरोधी पक्षनेते करत होते. त्यांच्या नेतृत्वात अध्यक्षांच्या दालनात ही सर्व घटना घडली असल्याचा आरोपही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे. त्याचबरोबर भजपावाल्यांना गुंडगिरी करून विधानसभेचं कामकाज चालवायचं असेल, तर हे कधीही चालणार नाही. गुंडगिरी करून सत्ता काबीज करता येत नसल्याचंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

सरकारला धारेवर धरल्याशिवाय आम्ही राहणार नाही- प्रविण दरेकर

कोणतीही धक्काबुक्की झालेली नाही, आम्ही त्यांना पुरुन उरलो- देवेंद्र फडणवीस

वारीला बंदी हे द्रौपदीच्या पदराला हात घालण्याचं पाप- संभाजी भिडे

‘…म्हणून मी मुख्यमंत्र्यांना ते पत्रं लिहिलं’; प्रताप सरनाईकांचा खुलासा

मोदी पेट्रोलच्या किंमती कमी करण्यासाठी नाहीतर भारताला विश्वगुरू बनवण्यासाठी आलेत- भाजप

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More