बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुणे विभागात 679 कोटींची थकबाकी; महावितरणकडून वीज बिल वसुलीच्या सूचना

पुणे | लॉकडाऊनच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. हातावर पोट असलेले अनेक जण बेरोजगार झाले. यामुळे 2020 पासून पुणे जिल्ह्यात अनेक नागरिकांकडून थकबाकी भरली जात नाहीये. त्यामुळे अशा परिस्थितीत वाढत्या वीजबिल थकबाकीमुळे महावितरणवरील आर्थिक संकट गडद झालं आहे. महावितरण पुणे विभागातील अधिकाऱ्यांना अंदाजे 679 कोटी किंमतीचं वीज बिल न भरल्याचा सामना करावा लागत आहे.

घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांकडून थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी मोहीम सुरू केली आहे. महावितरणने वीज बिल न भरणाऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई  देखील सुरू केली आहे.

पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सातारा आणि सांगली या पाच जिल्ह्यांमध्ये 13.86 लाख ग्राहक आहेत त्यांनी एप्रिल 2020 पासून ते आजपर्यंत वीज बिल भरलं नाही. मात्र त्यांचा वीज पुरवठा सुरू आहे, असं महावितरणने सांगितलं आहे. थकबाकीदारांनी लवकरात लवकर पुढील कारवाई टाळण्यासाठी जवळच्या एमएसईडीसीएल बिलिंग पेमेंट सेंटरला भेट द्यावी. महसूल नसल्यामुळे महावितरणला आपलं काम पार पाडताना आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागलं आहे, असंएमईडीसीएलच्या पीआरओ कार्यालयाने म्हटलंय.

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोना संकट काळामध्ये वाढीव वीज बिलं महावितरण कंपन्यांनी दिल्याने अनेकांनी संताप व्यक्त करत वीज दर कमी करण्याचे, वाढीव बीलांचा पुन्हा विचार व्हावा अशी मागणी केली होती मात्र महावितरण कंपन्यांनी वीज बिल न भरल्यास कनेक्शन कापण्याची धडक कारवाई सुरू केली होती. मात्र त्याचे तीव्र पडसाद उमटू लागल्याने महावितरण कंपनी आता एक पाऊल मागे घेतले आहे. आता कनेक्शन तोडण्याऐवजी बिल भरण्याची विनंती ग्राहकांना केली जात आहे.  हप्त्यांच्या माध्यमातून पूर्तता करण्यासाठी आवाहन केलं जात आहे.

थोडक्यात बातम्या- 

बंदी असतानाही फिरायला जाणं पडलं महागात; लोणावळ्यात 900 पर्यटकांकडून ‘इतक्या’ लाखांचा दंड वसूल

“सर्वकाही सुरळीत आणि मनाप्रमाणे होईल, पण देवेंद्र फडणवीस संन्यास घेऊ नका”

“आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून ही संजय राऊतांची सवय”

महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात तणावाचं वातावरण; शिवसैनिक-कर्नाटक पोलीस आमने सामने

“भाजपचे नेतेच ओबीसी आरक्षणाचे खरे मारेकरी, भाजपचं हे ढोंगी राजकारण”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More