बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

थकबाकीदारांची वीज कापणारच; महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या-रजा रद्द

मुंबई | उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळात चर्चा होईपर्यंत वीज बिलाची थकबाकी असणाऱ्यांची वीज तोडणी थांबवण्याचे आदेश दोन मार्चला दिले होते. थकबाकीदारांच्या वीज तोडणीला मिळालेल्या स्थगितीवर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी विधान परिषदेत एका निवेदनाद्वारे माहिती दिली की थकबाकीदारांच्या वीज तोडणीला आता स्थगिती राहणार नसून विज बिल न भरणाऱ्या ग्राहकांविरुद्ध महावितरणतर्फे विजतोडणीची कारवाई करण्यात येणार आहे.

कोरोनाकाळात आर्थिकदृष्ट्या दुर्बल झालेल्या महावितरणला त्यातून बाहेर काढण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच आहे. त्यामुळे थकबाकीदार ग्राहकांनी त्वरित आपली वीज बिल भरणा करून होणाऱ्या गैरसोयीला टाळावं असं आवाहन ऊर्जा मंत्र्यांनी यावेळी एका निवेदनाद्वारे विधानपरिषदेत केलं आहे. महाराष्ट्रात एकूण अडीच कोटी ग्राहकांपैकी 6 लाख 94 हजार ग्राहकांच्या तक्रारी आल्या होत्या. मात्र त्यापैकी 99 टक्के तक्रारींचं निरसन करण्यात महावितरणला यश आल्याचंही मंत्र्यांनी बोलून दाखवलं. महावितरणची सध्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे.

2014 ला 11 हजार 149 कोटी नफा असलेले महावितरण 2020 या साली 329 कोटी रुपये नफ्यावर खाली आले आहे. तसेच कर्जाची रक्कमही दुपटीने वाढली आहे. ऊर्जा मंत्र्यांनी काढलेल्या आदेशानुसार महावितरणच्या सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या रजा-सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना वीज तोडण्याची मोहीम राबवण्यासाठी कामावर पुन्हा रुजू होण्याचं सांगण्यात आलं आहे.

महावितरणची घरगुती ग्राहकांची एकूण थकबाकी 71 हजार 506 कोटी रुपये असून महावितरणवर 46 हजार 659 कोटी रुपयांचं कर्जही आहे. एकूण थकबाकीदारांपैकी 44.67 लाख रुपये शेतकऱ्याची थकबाकी असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच कृषी पंप धारकांकडील थकबाकी 45 हजार 750 कोटी रुपये एवढी आहे. महावितरणने अनेक अडचणींचा सामना करत ग्राहकांना विजेचा अखंड पुरवठा ठेवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आहेत त्यामुळे ग्राहकांनीही आता महावितरणला सहकार्य करावे असे ऊर्जामंत्री यांनी बोलून दाखवले आहे.

थोडक्यात बातम्या- 

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी खूशखबर; ‘या’ तारखेपासून होणार पगारवाढ?

ममता बॅनर्जींवरील हल्ल्याला वेगळं वळण; प्रत्यक्षदर्शीनं केला ‘हा’ मोठा खुलासा

आता लग्नाला फक्त 20 लोकांनाच परवानगी; महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात अत्यंत कडक निर्बंध लागू!

महाराष्ट्रातील ‘या’ प्रमुख धार्मिक ठिकाणी संचारबंदी; गुलाल उधळणे, पेढे वाटण्यास सक्त मनाई

शरद पवार-विश्वास नांगरे पाटलांच्या भेटीनं चर्चांना उधाण; ‘या’ विषयावर झाली चर्चा?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More