फक्त 416 रुपयांची बचत तुम्हाला बनवेल करोडपती; कसं ते जाणून घ्या

PPF Scheme | प्रत्येक जण आपल्या कमाईचा एक हिस्सा हा बचत करून ठेवत असतो. काही जण हे पैसे कुठेतरी गुंतवणूक करून ठेवतात. कठीण प्रसंगी कुणापुढे हात पसरायला लागू नये म्हणून ही बचत केली जाते. मात्र, चांगला परतावा देणारी गुंतवणूक निवडणेही फार कठीण असते. त्यातच विश्वासाची हमी देखील मिळेल की नाही?, याबाबत साशंकता असते. या लेखात तुम्हाला अशी एक स्कीम सांगणार आहोत, ज्याचा परतावा अधिक असेल शिवाय तुम्हाला पैशांची (PPF Scheme) हमी देखील मिळेल.

अनेक चांगल्या योजना आहेत, ज्या तुमच्या ठेवीच्या सुरक्षसोबतच चांगला परतावा देतात. यामधीलच एक म्हणजे सरकारी भविष्य निर्वाह निधी (PPF) म्हणजेच पीपीएफ. ही योजना खूप प्रचलित आहे. यामध्ये तुम्ही जर फक्त 416 रुपयांची बचत केली तर तुम्ही काही वर्षांमध्येच करोडपती होऊ शकता.

योजनेबद्दल अधिक माहिती

पीपीएफ योजना ही सरकारची एक योजना असून यामध्ये पैसे सुरक्षित ठेवण्याची हमी सरकारकडूनच दिली जाते. यात आपण व्याजदराबद्दल बोललो तर त्यात गुंतवणूक करणाऱ्या (PPF Scheme) गुंतवणूकदारांना सध्या 7.1 टक्के दराने व्याज मिळत आहे.

या योजनेसाठी तुम्ही 500 रुपयांपासून गुंतवणुक करू शकता. जर तुम्ही पब्लिक प्रॉव्हिडंट फंड स्कीममध्ये गुंतवणूक सुरू करणार असाल तर तुम्ही वार्षिक किमान 500 रुपये आणि कमाल 1.5 लाख रुपये गुंतवू शकता.

करोडपती कसं व्हाल?

या योजनेचा परिपक्वता कालावधी हा एकूण 15 वर्षांचा आहे. तुम्ही तो अजून पाच वर्षांसाठी वाढवू देखील शकता. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, या योजनेतून करोडपती कसं होणार?, तर याचंही उत्तर इथे दिलं आहे.

समजा तुम्ही दररोज 416 रुपये एवढी रक्कम वाचवली तर दर महिन्याला 12,500 रुपये जमा होतील. तुमच्याकडे वार्षिक 1.5 लाख रुपये असतील. जर तुम्ही ही रक्कम PPF स्कीममध्ये (PPF Scheme) गुंतवली आणि मॅच्युरिटीनंतर 10 वर्षांसाठी वाढवली, म्हणजे, जमा केलेली रक्कम मॅच्युरिटीपर्यंत काढण्याऐवजी, तुम्ही ती पाच वर्षांसाठी वाढवली, तर तुमची गुंतवणूक 25 वर्षांत 1 कोटी होईल. 7.1 टक्के व्याजाच्या दृष्टीने पाहिले तर 25 वर्षांनंतर मॅच्युरिटीच्या वेळी तुमच्याकडे 1,03,08,015 रुपये असतील.

News Title :  PPF Scheme

महत्त्वाच्या बातम्या-

15 ऑगस्ट असणार खास; थार रॉक्ससोबत ओला बाईक होणार लाँच

नागा चैतन्यच्या साखरपुड्यानंतर समंथालाही मिळाला पार्टनर?, कोण आहे हा मिस्त्री मॅन?

‘या’ गोष्टींमुळेही वाढतो Heart Attack चा धोका; बातमी वाचून झोप उडेल

पुणेकरांसाठी अभिमानाची बाब! गुन्हे शाखेच्या पोलीस आयुक्तांना मिळणार विशिष्ट सेवा पोलीस पदक

श्रावणात चिकनपेक्षाही वांगी झाली महाग, इतर भाज्यांचेही दर कडाडले