महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 सांगली

प्रभाकर देशमुखांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणणार; रामोशी समाजाचा निर्धार

सातारा |  माण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार प्रभाकर देशमुख यांना सर्व जाती-धर्मातील लोकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. सोमवारी माण-खटावमधील रामोशी समाजाच्या हजारो कार्यकर्त्यांनी श्री देशमुख यांना एकमुखी पाठिंबा देवून मोठ्या मताधिक्याने निवडून आणायचा निर्धार केला.

यावेळी सचिन पाटोळे (गोंदवले बुद्रुक), दिलीप चव्हाण, संजय माने (गोंदवले बुद्रुक), संजय जाधव (कुकुडवाड), अर्जुन जाधव (बोथे), विकास चव्हाण (वावरहिरे), विशाल जाधव (देवापूर), नितीन चव्हाण (म्हसवड), पै. विक्रम चव्हाण (मार्डी), पै. दादा पाटोळे (मोही),  (पिंपरी), अजय मदने (शिंगणापूर), कांतू जाधव (कोळेवाडी) यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रभाकर देशमुख यांचं नेतृत्व हे सर्वसामवेशक असून सर्वांना सोबत घेवून काम करण्याची त्यांची पद्धत अतिशय चांगली आहे. समाजाला चांगल्या दिशेने घेवून जाण्यासाठी त्यांच्या सुरु असलेल्या प्रयत्नात आम्ही त्यांच्या सोबत आहोत. प्रभाकर देशमुख यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यात आमचा सिंहाचा वाटा असेल असे आश्वासन सर्वांनी दिले.

लढवय्या असलेल्या रामोशी समाजातील तरुणांना शैक्षणिक प्रवाहात आणून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही प्रभाकर देशमुख यांनी यावेळी दिली.

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या