बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘तुम्ही प्रवाहाच्या विरूद्ध पोहता तेव्हा…’; साईलच्या आरोपानंतर क्रांती रेडकरचं प्रत्युत्तर

मुंबई | क्रुझ ड्रग्स प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. आर्यन खानला सोडवण्यासाठी 25 कोटी रूपयाचा करार झाला होता. हा करार 18 कोटी रूपयांना ठरला होता. त्यातील 8 कोटी रूपये समीर वानखेडे यांना दिले जाणार होते, असा धक्कादायक आरोप किरण गोसावी यांचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल यांनी समीर वानखेडे यांच्यावर लावला आहे. त्यावर आता समीर वानखेडे यांची प्रत्नी क्रांती रेडकर यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे.

जेव्हा तुम्ही प्रवाहाच्या विरुद्ध पोहता तेव्हा बुडण्याचा धोका सर्वाधिक असतो. मात्र जगातील सर्वशक्तिमान परमेश्वर तुमच्यासोबत असतो, तेव्हा जगातील कुठलीही लाट तुम्हाला बुडवू शकत नाही, असं क्रांती रेडकर म्हणाली.

रविवारी प्रभाकर साईल यांनी समीर वानखेडे यांच्यावर धक्कादायक आरोप लावल्यामुळे राज्यात खळबळ उडाली. आर्यन खान प्रकरणी 18 कोटी रूपयांचा करार झाला होता. त्यातील 8 कोटी रूपये समीर वानखेडेंना देण्यात येणार होते. त्याचबरोबर कोऱ्या कागदावर आपली सही घेण्यात आली होती, असंही प्रभाकर साईल यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, तसेच नवाब मलिक यांनी ट्विटरवर समीर वानखेडे यांच्यासंबंधित जन्मदाखल्याचा आणि त्याचा जुना फोटो शेअर केला आहे. समीर वानखेडे यांनी गैरप्रकार करून नोकरी मिळवण्याचा दावा ही नवाब मलिक यांनी केला आहे. त्यामुळे आर्यन खान प्रकरणाला आता राज्यात वेगळेच वळण लागल्याच दिसून येत आहे.

थोडक्यात बातम्या- 

पाकिस्तानविरूद्ध भारताचा पराभव अन् सांगलीत टीव्ही फोडला; पाहा व्हिडीओ

..अन् अपघातात जखमी झालेल्यांना मदत करण्यासाठी भागवत कराड उतरले डाॅक्टरांच्या भूमिकेत

‘पाकिस्तानविरुद्ध आपण कधी ना कधी हरणार’, धोनीची ‘ती’ भविष्यवाणी खरी ठरली

समीर वानखेडेंवरील आरोपांच्या चौकशीला सुरूवात; वानखेडे दिल्लीला जाण्याची शक्यता

“यांच्या बायकोने मारलं तरी सांगतील की, केंद्र सरकारचा हात आहे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More