बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“समीर वानखेडेंविरुद्ध षडयंत्र, महाविकास आघाडीच्या दबावातून प्रभाकर साईलने…”

मुंबई |  आर्यन खान प्रकरणाला आता नवीन वळण मिळालं आहे. के.पी गोसावीचा बाॅडीगार्ड प्रभाकर साईलनं समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. साईलनं एक प्रतिज्ञापत्र दिलं आहे. या प्रतिज्ञापत्रानंतर राज्यातील वातावरण प्रचंड गोंधळात आहे. प्रभाकर साईलच्या खुलास्यानंतर राज्यातील राजकारण तापलेलं आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे.

रामदास आठवले यांनी महाविकास आघाडीवर प्रश्नचिन्ह लावले आहे. प्रभाकर साईलचा समीर वानखडे यांच्यावर आरोप करणारा व्हिडिओ समोर आला आहे. प्रामाणिक अधिकारी असणाऱ्या समीर वानखडे यांच्या विरुद्ध षडयंत्र असण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीच्या दाबावातून साईल ने आरोप केले असावेत. याची चौकशी व्हावी, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.

केपी गोसवी सध्या गायब आहे. परिणामी या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार प्रभाकर साईल सध्या जोरदार चर्चेत आहे. प्रभाकर साईलच्या सुरक्षेसाठी राज्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्याकडं मागणी केली होती. राज्याच्या गृहविभागातर्फे साईलला सुरक्षा पुरवण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली आहे. आता रामदास आठवले यांच्या आरोपांनी राज्यात खळबळ माजली आहे.

दरम्यान, आर्यन खान प्रकरणाच्या निमित्तानं केंद्रीय तपास यंत्रणा आणि राज्याचं गृहखातं पुन्हा एकमेकांसमोर उभं ठाकलं आहे.  राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी राज्य सरकारला या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची विनंती केली आहे. परिणामी आता या प्रकरणात पुढे काय होतं हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

पाहा ट्विट-

थोडक्यात बातम्या 

‘शमी आम्ही तुझ्यावर प्रेम करतो’; शमीवर टीका करणाऱ्यांना दिग्गजांनी झापलं

तुमचंही कमी वयात टक्कल पडतंय का? जाणून घ्या कारण

“बायकोनं मारलं तरी केंद्रानं मारलं म्हणून सांगतील”

“…म्हणून या नाना पटोलेला गरिबाचं दु:ख जास्त कळतं”

आयपीएलला मिळाले 2 नवे संघ! आयपीएल इतिहासातील विक्रमी बोली लागली

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More