बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जळगावच्या तरूणाकडून देशाचं नाव मोठं, गुआनाजुअतो विद्यापीठाकडून सन्मान

चाळीसगाव | जळगावच्या प्रदीप नाहिदे या तरूणानं शैक्षणिक कर्तृत्वावर जगामध्ये देशाचं नाव मोठं केलंय. पीएचडीमध्ये सलग दुसऱ्या वर्षी सर्वात जास्त गुण मिळाल्यानं त्याला गुआनाजुअतो विद्यापीठाकडून गौरवण्यात आलंय.
गुआनाजुअतो विद्यापीठाकडून सलग दुसऱ्यांदा पदक मिळवणारा प्रदीप पहिला भारतीय ठरलाय. दरवर्षी कला, वाणिज्य, विज्ञान आणि अभियांत्रिकी शाखेत सर्वाधिक गुण मिळवणाऱ्यांना  हे पदक दिलं जातं. 
प्रदीपला रसायन शास्त्रात पोस्ट डॉक्टरेट करून देशासाठी काम करायची इच्छा आहे. गरीब मुलांना शिक्षण देऊन त्यांच्यासाठी वेगवेगळ्या विज्ञानाच्या विषयावर संशोधन करता येईल अशा प्रकारची शाळा त्याला बनवायची आहे, असं त्यानं थोडक्यातला सांगितलं.
 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More