बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

प्रदीप शर्माची तळोजा कारागृहात रवानगी, 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

मुंबई | अँटिलियाबाहेरील स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात मुंबई पोलिस दलातील माजी अधिकारी प्रदीप शर्मा यांना 17 जुन रोजी राष्ट्रीय तपास यंत्रणेने म्हणजेच एनआयएने अटक केली होती. एनआयएने शर्मांच्या घरावर छापेमारी केली होती. त्यांच्याविरोधात नव्यानं पुरावे मिळाल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यांना एनआयएने अटक केली.

अँटिलियाबाहेरील स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावल्याचा आरोप प्रदीप शर्मा यांच्यावर करण्यात आला आहे. एनआयएने अटक केलेल्या प्रदीप शर्मा याची सोमवारी 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. तर याच प्रकरणात मनीष सोनी आणि सतीश मोतकरी यांना देखील एनआयएने अटक केली होती. त्यांना 1 जुलैपर्यंंत एनआयए कोठडी देण्यात आली आहे.

एनआयएने त्याची न्यायालयीन कोठडीत पाठविण्याची विनंती केली होती. एनआयएच्या मागणीवरून त्याची रवानगी आता न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. तळोजा आणि आर्थर रोड कारागृहात मला धोका आहे, या दोन्ही कारागृहात मला पाठवू नका. त्याऐवजी ठाणे कारागृहात पाठवावे, अशी विनंती प्रदीप शर्मा यांनी केली. यासंबंधी त्यांनी न्यायालयात एक अर्ज सादर केला होता.

दरम्यान, प्रदीप शर्माचा अर्ज फेटाळून लावत संबंधित कारागृह त्यावर निर्णय घेईल, असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे प्रदीप शर्माला तळोजा कारागृहातच जावं लागलं. तळोजा कारागृहात सध्या याच प्रकरणात आरोपी असलेले सचिन वाझे, सुनील माने हे देखील आहेत.

थोडक्यात बातम्या-

मराठमोळ्या राहीनं पटकावलं गोल्ड मेडल; देशाला पहिलं सुवर्णपदक

पुण्यात आजपासून संचारबंदी लागू; ‘या’ वेळेत विनाकारण फिरणाऱ्यांवर होणार कारवाई 

“डबल इंजिन सरकारने बिहारमधील सर्व जिल्ह्यांमध्ये 100 रुपये लिटर पेट्रोल केल्याबद्दल अभिनंदन”

होय, मी भक्त आहे आणि मला अभिमान आहे – अमृता फडणवीस

दिलासादायक! महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात घट, वाचा आजची आकडेवारी

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More