प्रधानमंत्री जन आरोग्य योजना काय आहे? अशाप्रकारे करा नोंदणी

Pradhan Mantri Jan Arogya Yojana l केंद्र सरकार सर्वमान्यांसाठी नवनवीन योजना राबवत आहेत. अशातच सरकारने प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत गरजूंना आरोग्यविषयक सोई-सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही एक आरोग्य विमा योजना आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे ही जगातील सर्वांत मोठी आरोग्य योजना आहे.

या योजनेमार्फत गरजूंना वैद्यकीय तपासणी, डॉक्टरांचा मोफत सल्ला आणि उपचार घेता येतो. गरीब लोकांना उत्तम दर्जाची दवाखान्याची सोय उपलब्ध व्हावी हे या योजनेचे सर्वात महत्वाचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे गरिबांना आरोग्याशी संबंधित कोणत्याही आर्थिक संकटाचा सामना करावा लागू नये अशा पद्धतीने या योजनेची रचना करण्यात आली आहे.

अशाप्रकारे नोंदणी करा? :

१. सर्वात प्रस्तं pmjay.gov.in वरून PMJAY पोर्टलवर जा

२. त्यानंतर नोंदणी करण्यासाठी मेनूमधून PMJAY Gov निवडा

३. यानंतर तुमची संपूर्ण माहिती भरा.

४.तसेच तुमचा मोबाईल नंबर व्हेरीफाय करून घ्या.

५. यानंतर तुमची वैयक्तिक माहिती भरा.

६. यासोबतच कागदपत्रे अपलोड करा

७. पुन्हा एकदा फॉर्म बरोबर असल्याची खात्री करा आणि पुष्टी करा अशाप्रकारे तुम्ही अगदी सहजरित्या फॉर्म भरू शकता.

महत्वाची बाब म्हणजे ज्या नागरिकांचे वय ७० पेक्षा जास्त आहे, असे ज्येष्ठ नागरिक आयुष्मान अॅपवरून थेट नोंदणी देखील करू शकतात. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २९ ऑक्टोबरला आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत आयुष्मान वय वंदना हेल्थ कार्ड लाँच देखील करण्यात आले आहे. त्यामुळे आता प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत ज्येष्ठ नागरिकांना नोंदणी करण्यासाठी फक्त आधार कार्ड असणे आवश्यक आहे.