अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी नव्या योजनेची घोषणा, प्रधानमंत्री धनधान्य योजना काय?

Pradhanmantri Dhandhanya Yojana Announced for Farmer in Budget 2025

Budget 2025 | अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री धनधान्य योजना जाहीर करण्यात आली असून, राज्य सरकारांच्या सहकार्याने ही योजना राबवण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून तब्बल १.७ कोटी शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. गरीब, युवा, महिला आणि शेतकऱ्यांच्या उन्नतीवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार असल्याचे अर्थमंत्री सीतारमण यांनी यावेळी स्पष्ट केले. (Budget 2025 )

शेतकऱ्यांची प्रगती, ग्रामीण भागाचा विकास आणि उत्पादन क्षेत्राला चालना देण्यावर सरकारचा भर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच वित्तीय क्षेत्रातील सुधारणांवरही लक्ष केंद्रित केले जाणार आहे. १०० जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री धनधान्य योजनेची सुरुवात होत आहे. यासोबतच किसान क्रेडिट कार्डची मर्यादाही वाढवून ती ५ लाख रुपये करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा

प्रधानमंत्री धनधान्य योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत मिळणार आहे. या योजनेचा लाभ देशातील १.७ कोटी शेतकऱ्यांना होणार असल्याने, ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.

किसान क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवली

शेतकऱ्यांना सहज कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी किसान क्रेडिट कार्डची मर्यादा ३ लाखांवरून ५ लाख रुपये करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे भांडवल सहज उपलब्ध होईल आणि त्यांना शेतीचा विकास करता येईल. (Budget 2025 )

Title : Pradhanmantri Dhandhanya Yojana Announced for Farmer in Budget 2025

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .