Top News महाराष्ट्र मुंबई

“काँग्रेसच्या ‘या’ नेत्यामुळे शरद पवारांचं पंतप्रधानपद हुकलं”

मुंबई | राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल पटेल यांनी एका इंग्रजी दैनिकात शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त लिहिलेल्या लेखात त्यांच्या पंतप्रधानपदाविषयी मोठं वक्तव्य केलं आहे.

राजीव गांधी यांच्या हत्येनंतर फक्त शरद पवारांना दूर ठेवणं या एकाच अजेंड्यासाठी नरसिंह राव यांना पुढे आणलं गेलं. देशभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांना मात्र शरद पवार हवे होते मात्र फक्त नरसिंह राव यांच्यामुळे एच. डी. देवेगौडा यांचे सरकार बनलं, असं प्रफुल पटेल यांनी म्हटलं आहे.

सुनियोजित बंड घडवून आणणे, आपल्या पक्षात स्वतच प्रदेश पातळीवरील नेतृत्वाला कमजोर करण्याचा प्रयत्न करणे, अशी काँग्रेस पक्षाची काम करण्याची पद्धत आहे. जे शरद पवारांसोबतही केलं गेलं, असंही पटेल यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनीही पटेल यांच्या वक्तव्याला दुजोरा देत म्हटले की, पवारांना याआधीच पतंप्रधान पद भेटायला हवं होतं.

थोडक्यात बातम्या –

‘…तर तुम्हाला आज धनंजय मुंडे दिसला नसता’; धनंजय मुंडेंचं मोठं वक्तव्य

‘या’ राज्यात नागरिकांना कोरोना लस मिळणार मोफत, मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

“देशात एकच राज्यपाल आहेत आणि तेच सर्व निर्णय घेतात, असं या रामाला वाटत असावं”

‘हे सत्ताधारी आहेत की गुंडांची फौज?’; शिवसेना नेत्याने दिलेल्या धमकीवर भाजपचा सरकारवर निशाणा

शेतकऱ्यांचा अवमान करणारे दानवे हे येडपट आणि भैताड- विजय वडेट्टीवार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या