Sharad Pawar & Ajit Pawar l महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय घडामोडींना नवे वळण येण्याची चिन्ह दिसत आहेत. कारण शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील दरी दूर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच आता ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे.
प्रफुल्ल पटेल यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण :
राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे. “शरद पवार आणि अजित पवार हे एकत्रित येणे चांगली गोष्ट आहे”, असं मोठं वक्तव्य प्रफुल्ल पटेल यांनी केलं आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील संबंधांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे आगामी काळात एकत्र येण्याची शक्यता आहे. कारण आज अजित पवार यांच्या मातोश्री आशा पवार यांनी पंढरपूरला जावून विठुरायांचं दर्शन घेतलं. त्यावेळी त्यांनी आपलं कुटुंब पुन्हा एकत्र यावं, अशी भावना व्यक्त केली आहे.
Sharad Pawar & Ajit Pawar l प्रफुल्ल पटेल नेमकं काय म्हणाले? :
प्रफुल्ल पटेल म्हणाले की, “शरद पवार हे आमचे दैवत आहेत. काही राजकीय कारणांवरून आम्ही वेगळे जरी झालो असलो तरी मात्र त्यांच्याविषयी आमच्या मनामध्ये आज देखील आस्था आहे. भविष्यात सुद्धा पवार कुटुंबीय एकत्रच आलं तर यात मात्र काही गैर नाही.” असं प्रफुल्ल पटेल म्हणाले आहेत.
कारण “मी सुद्धा स्वतःलाच पवार कुटुंबाचा एक सदस्य समजत आहे. त्यामुळे पवार कुटुंब एकत्र यावं अशी माझी सुद्धा इच्छा आहे. तसेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सुद्धा त्यांना भेटायला गेलो होतो. अनेकांनी राजकीय तर्कवितर्क लावले आहेत. याशिवाय त्यांच्या बरोबरचे संबंध आम्हाला आजही टिकवायचे आहेत”, अशी प्रतिक्रिया प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे.
News Title : praful patel big statement about sharad pawar and ajit pawar
महत्त्वाच्या बातम्या-
वाल्मिक कराडच्या गुन्ह्यांची कुंडली आली समोर! 25 वर्षात तब्बल ‘इतके’ गुन्हे दाखल
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली? ऑक्सिजन लावले… नेमकं काय झालं
‘मी पवार साहेबांना फसवलं, आता त्यांच्यासमोर लोटांगण घालून पाया…’; ‘या’ आमदाराचं मोठं वक्तव्य
अनुराग कश्यपने बॉलिवूड इंडस्ट्रीची काढली अक्कल; घेतला सर्वात मोठा निर्णय
जेवण तर दूरच साधा चहादेखील घेतला नाही…; कराडचा तुरुंगात कसा गेला पहिला दिवस?