मोदींना जिरेटोप घातल्याने उफळला वाद; प्रफुल पटेलांची पोस्ट चर्चेत मात्र माफी नाहीच

Praful Patel | सध्या देशासह राज्यात लोकसभा निवडणूक सुरू आहे. वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर जे काही घडलं त्यामुळे राज्यात संतापाची लाट आहे. अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर छत्रपती शिवाजी महाराज यांचे जिरेटोप स्वत:च्या हाताने परिधान केलं. यामुळे आता राज्यात संताप व्यक्त केला जात आहे. प्रफुल्ल पटेल (Praful Patel) दिलगीरी व्यक्त करतील असं वाटत होतं मात्र तसं झालं नाही.

काय होतं नेमकं प्रकरण?

14 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा वाराणसीमधून उमेदवारी मिळवली. त्यांनी उमेदवारी अर्ज देखील दाखल केला. त्यानंतर नरेंद्र मोदी यांना अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी जिरेटोप घातला. यामुळे या जिरेटोप प्रकरणाला वादाचे स्वरूप प्राप्त झालं आहे. यावरून आता संभाजी ब्रिगेेड, उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गट आक्रमक होताना दिसत आहे. पटेल यावर माफी मागतील असं वाटत होतं. मात्र, त्यांनी माफी मागितली नाही आणि दिलगिरी व्यक्त केली नाही.

काय म्हणाले प्रफुल्ल पटेल?

जिरेटोप प्रकरणावर शिवभक्तांनी नाराजी दाखवली होती. यामुळे राजकारण तापलं होतं. यामुळे आता प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली होती. त्या पोस्टमुळे त्यांनी चुकही व्यक्त केली नाही आणि दिलगिरी व्यक्त केली नाही. त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं की,  “हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आणि प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या आदर्शांवर व लोककल्याणाच्या मार्गावर मार्गक्रमण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान होईल, अशी कोणतीही गोष्ट कधी मनातही येऊ शकत नाही. यापुढे काळजी घेऊ,” अशी पोस्ट केली.

PateLComment

पटेल यांच्या या कृतीने संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते संतापले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे इतर कोणीही जिरेटोप परिधान करू शकत नाहीत. पंतप्रधान हे छत्रपती नाहीत. त्यांनी जिरेटोपाचा अवमान करू नये, अशा इशाराच संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.

जिरेटोप प्रकरणावरून आता शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. जिरेटोप नरेंद्र मोदी यांना घातला यात मोदींची चुक काय? जिरेटोपवरून असं राजकारण करू नका, असं उदय सामंत म्हणाले आहेत. अशा प्रकारची पुनरावृत्ती होणार नाही असं उदय सामंत म्हणाले आहेत.

News Title – Praful Patel First Comment On Chhatrapati Shivaji Maharaj Jiretop On Pm modi Head

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्यांसोबत पावसाची थट्टा; ‘या’ भागांना अवकाळीचा फटका बसणार

ग्राहकांसाठी आनंदवार्ता! सोन्याचे भाव घसरले; जाणून घ्या दर

बापरे! 72 तासांत 8 किलो सोने, 14 कोटी रोकडसह 170 कोटींची मालमत्ता जप्त; कोण आहे मालक

मोदींपेक्षाही कंगना रनौत श्रीमंत; संपत्तीचा आकडा वाचून हैराण व्हाल

पंतप्रधान नरेंद्र मोदींची एकूण संपत्ती किती? आकडेवारी एकूण व्हाल थक्क