महाराष्ट्र मुंबई

“ईडीची नोटीस येणं स्वस्त झालंय, आजकाल कुणालाही नोटीस बजावल्या जातात”

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीकडून नोटीस आली आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ईडीच्या नोटीसमध्ये काहीच नवीन नाही. भारतात अनेकांना ईडीच्या नोटीस येतात. हे आता स्वस्त झालंय, असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय.

ईडीची नोटीस येणं याचं कुणालाही वाईट वाटत नाही. कारण आजकाल कुणालाही नोटीस बाजवली जाते, मग त्या व्यक्तीचा संबंध असो वा नसो, असा टोला प्रफुल्ल पटेल यांनी लगावला.

ईडीच्या नोटीसला गांभीर्यानं घेण्याची गरज नाही. कुणी चुकीचं केलं तर बाहेर येईल. यात राजकारण आहे का हे ही त्यामुळे दिसून येईल, असंही प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय.

थोडक्यात बातम्या-

मूठभर बिल्डरांच्या फायद्याचा प्रस्ताव मागे घ्या- देवेंद्र फडणवीस

हे काय पंतप्रधानपद आहे का?; पी चिदंबरम यांनी उडवली शरद पवारांची खिल्ली

सिनेमा पाहण्यासाठी गावकऱ्यांनी केला हा अजब जुगाड!

गाड्यांवर जातिसूचक स्टिकर लावणं महागात पडणार!

“असा तेजस्वी पंतप्रधान भारताला लाभणं, हे आपलं सौभाग्यच”

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या