Top News अहमदनगर महाराष्ट्र

‘संभाजीनगर हा शिवसेनेचा विषय’; राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्याचं वक्तव्य

अहमदनगर | औरंगाबादच्या नामंतराचा विषय सध्या चांगलाच पेटत चालला आहे. काँग्रेसने नामंतराला विरोध केला होता त्यामुळे राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अशातच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय‌मंत्री प्रफुल पटेल यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

संभाजीनगर हा शिवसेनेचा विषय आहे. हा विषय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजेंड्यावरील विषय नसल्याचं प्रफुल पटेल यांनी म्हटलं आहे. ते शिर्डीत दर्शानावेळी आले होते त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

शिवसेनेकडून अनेक वर्षांपासून औरंगाबादचा संभाजीनगर असा उल्लेख केला जातो. तो शिवसेनेचा विषय आहे. जेव्हा शासनाचा विषय येईल, तेव्हा तिन्ही पक्षांची समन्वय समितीत चर्चा होईल. इतक्या लवकर भाष्य करणं उचित नाही, असंही पटेल यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी भंडारामधील घटनेवरही आपलं मत व्यक्त केलं.

दरम्यान, नेमका निष्काळजीपणा का झाला याबाबत चौकशी व्हायला हवी. राज्य सरकार आणि आरोग्य विभागाने अशा घटना गांभिर्याने घेत सक्तीने कारवाई करावी, असं पटेल म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

“आघाडीमध्ये पहिल्यापासूनच बिघाड आहे, यांनी राज्याला बिघडवू नये”

“सामनात किंवा सोशल मीडियात संभाजीनगर लिहून नाव बदलत नाही त्यासाठी…”

ऑस्ट्रेलियाचा रडीचा डाव! भारताच्या ‘या’ खेळाडूंवर वर्णद्वेषाची टीका, तक्रार दाखल

‘मुख्यमंत्र्यांनी शहरांची नाव बदलण्यावर जोर देण्याऐवजी सरकारी दवाखान्यांकडे …’; काँग्रेस नेत्याचा ठाकरेंवर निशाणा

“बाळासाहेबांच्या जयंती दिवशी औरंगाबादचे नाव संभाजीनगर करावं”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या