मुंबई | राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) नोटीस पाठवण्यात आली आहे. दीपक तलवार प्रकरणात ही नोटीस बजावण्यात आल्याचं समजतंय.
दीपकवर ‘कॉर्पोरेट सोशल रिस्पॉसिबिलिटी’साठी राखून ठेवण्यात आलेले 90 कोटी रुपये हडप केल्याचा आरोप आहे. प्रफुल्ल पटेल नागरी हवाई वाहतूक मंत्री असताना दीपक त्यांच्या संपर्कात होता, असं बोलले जाते.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी तिहार जेलमधील एका व्यक्तीमुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांची झोप उडते, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. त्यांचा रोख पटेल यांच्याकडेच होता अशी चर्चा आता रंगत आहे.
दरम्यान, येत्या 6 जून रोजी प्रफुल्ल पटेल यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
महत्वाच्या बातम्या
-आम्ही तुमच्यासोबत का यावं??; वंचितचा काँग्रेस-राष्ट्रवादीला सवाल
-गृहमंत्रीपदाचा पदभार स्विकारताच अमित शहा म्हणतात…
…नाहीतर राज्यात विधानसभा निवडणूक होऊ देणार नाही- वंचित बहुजन आघाडी
-‘होय मी प्रेम करते’; लोकसभेतल्या ‘या’ महिला खासदाराने दिली प्रेमाची जाहीर कबुली
-“शून्य अधिक शून्य कधीही एक होत नाही; मुनगंटीवारांची काँग्रेस-राष्ट्रवादीवर सडकून टीका
Comments are closed.