बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अखेर काँग्रेसच्या प्रयत्नांना यश, भाजपने निवडणुकीत दिला काँग्रेसला हात

मुंबई | काँग्रेसचे दिवंगत खासदार राजीव सातव यांचं मागच्या वर्षी निधन झालं होतं. निधनानंतर त्यांच्या जागेवर पत्नी प्रज्ञा सातव यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीबाबत राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या होत्या. परंतु प्रज्ञा सातव यांच्या ऐवजी रजनी पाटील यांना काॅग्रेसच्या वतीने राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली.

विधान परिषदेचे आमदार शरद रणपिसे यांचं सप्टेंबरमध्ये निधन झालं होतं. त्यांच्या निधनानंतर विधान परिषदेच्या रिक्त जागेसाठी राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांचा अर्ज काँग्रेसकडून दाखल करण्यात आला होता. प्रज्ञा सातव यांच्या विरोधात भाजपचे उमेदवार संजय केणेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

या पदासाठीची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी काँग्रेसने प्रयत्न सुरू केल्याचं गेल्या काही दिवसात पाहायला मिळत होतं. भाजपकडून दाखल करण्यात आलेला हा अर्ज मागे घेण्यात यावा यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट देखील घेतली होती.

अखेर काँग्रेसच्या या प्रयत्नांना यश आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. काँग्रेसच्या विनंतीनंतर भाजपने ही निवडणूक बिनविरोध करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यानुसार आता राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेत थेट बिनविरोध निवडून जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

थोडक्यात बातम्या

वानखेडे-मलिक वादात आता नवाब मलिकांच्या दोन्ही मुलींची उडी

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, राज्यातील ‘या’ भागात विजांच्या कडकडाटासह होणार पाऊस

“रझा अकादमी कोणाचं पिल्लू आहे हे सगळ्यांना माहित आहे”

“महापुरास मोदी सरकार जबाबदार असल्याचा आरोप न केल्याबद्दल राज्य सरकारचे धन्यवाद”

नवज्योतसिंग सिद्धू यांनी आधी स्वत:च्या मुलांना सीमेवर पाठवावे, मग….

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More