बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

प्रज्ञा ठाकूर यांचे तोंड काळे करणाऱ्यांना भीम आर्मी देणार पुरस्कार

मुंबई | शहिदांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या प्रज्ञासिंह ठाकूर यांच्याविषयी महाराष्ट्र भीम आर्मीने कठोर भूमिका घेतली आहे. प्रज्ञा ठाकूर यांना गावबंदी करुन तोंड काळे करणाऱ्यांना भीम आर्मी पुरस्कार देणार असल्याची घोषणा केली आहे.

प्रज्ञा ठाकूर यांना उमेदवारी देऊन भाजपने शहिदांचा घोर अपमान केला आहे, असं भीम आर्मीचे महाराष्ट्र प्रमुख अशोक कांबळे यांनी म्हटलं आहे.

देशप्रेमाचा आव आणणाऱ्या भाजपने प्रज्ञा ठाकूर यांनी उमेदवारी देऊन त्यांचे देशप्रेम किती बेगडी आहे, याची प्रचिती करुन दिली आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, भाजपने मालेगाव बाॅम्बस्फोटातील मुख्य आरोपी प्रज्ञा ठाकूर यांना मध्य प्रदेशच्या भोपाळमधून लोकसभेची उमेदवारी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

-राज ठाकरेंच्या सभांना आता उत्तर भारतीयांकडूनही मागणी

-“पंतप्रधान नरेंद्र मोदी देश चालवत आहेत की ‘पबजी’ खेळत आहेत?”

-भाजपला धक्का; विद्यमान खासदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश

गांधी-नेहरू कुटुंबीयांवर टीका करण्यापेक्षा 5 वर्षात काय केलं ते सांगा- प्रियांका गांधी

उमेदवारी अर्ज भरताच गंभीरही झाला ‘चौकीदार’

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More