बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“नेत्यांच्या निधनानंतर जशी सहानुभूतीची लाट येते, तशी शेतकऱ्यांचा आत्महत्येनंतर का नाही?”

मुंबई | एखाद्या राजकीय नेत्याच्या निधनाने जशी सहानुभूतीची लाट येते तशी लाट शेतकऱ्यांच्या आत्महत्येनंतर का येत नाही, असा सवाल प्रहारच्या यवतमाळ मतदार संघातील लोकसभेच्या उमेदवार वैशाली येडे यांनी उपस्थित केला आहे.

नेत्यांच्या निधनानंतर त्यांचे वारस केवळ सहानुभूतीवर निवडून येतात. मात्र, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियाला कायम वाऱ्यावर का सोडलं जातं, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

राजकारणाचे शुद्धीकरण करायला हवं, सर्वसामान्यांनाही लोकप्रतिनिधी करायला हवं, असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, वैशाली येडे आत्महत्याग्रस्त कुटुंबातील आहेत. त्यांच्या पतीने कर्जबाजारीपणाला आणि सततच्या नापिकीला कंटाळून आत्महत्या केली होती. 

महत्वाच्या बातम्या-

नरेंद्र मोदी हे केवळ संकट नव्हे तर राष्ट्रीय आपत्ती- शरद पवार

-युद्धात व निवडणुकांत सगळे गुन्हे माफ असतात- उद्धव ठाकरे

-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे ‘नातू चलाव पार्टी’- सुजय विखे

-भाजपच्या जाहीरनाम्यातून 10 चेहरे गायब, उरला फक्त एकच चेहरा

-राज ठाकरे म्हणजे वाट चुकलेले नेते- देवेंद्र फडणवीस

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More