प्रहारच्या कार्यकर्त्यांचा राडा, गटविकास अधिकाऱ्याला मारहाण

औरंगाबाद | आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने औरंगाबाद पंचायत समिती कार्यालयात तोडफोड केलीय. तसेच गटविकास अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप देखील होतेय. 

औरंगाबादच्या पंचायत समिती कार्यालयात प्रहारचे काही कार्यकर्ते आले होते. त्यावेळी या कार्यकर्त्यांनी आपल्याला अरेरावीची भाषा वापरली, असा आरोप एम.जी. राठोड या अधिकाऱ्यांनी केलाय. गटविकास अधिकाऱ्याच्या अंगावर खुर्च्या फेकल्या गेल्या. यापैकी एक खुर्ची शिपायाला खुर्ची लागली, त्याने सीटी चौक पोलीस ठाण्यात तक्रार दिलीय. 

अपंगांच्या निधीचं काय झालं? अशी विचारणा करण्यासाठी प्रहारचे कार्यकर्ते आले होते. त्यावेळी बाचाबाची होऊन हा प्रकार घडला. दरम्यान, प्रहारकडूनही यासंदर्भात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आल्याचं कळतंय.