बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘देवेंद्र फडणवीसांनी चमत्कार केला’; शरद पवार यांच्याकडून फडणवीसांचं कौतुक

पुणे | राज्यसभा निवडणुकीचा निकाल हाती आला आहे. महाविकास आघाडीचे 3 उमेदवार विजयी झाले आहे. तर भाजपचे दोन उमेदवार विजयी झाले आहे. पण, अपक्षांची मत फुटलं असल्याची समोर आलं आहे.

महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारसोबत असलेल्या आमदारांपैकी काही आमदारांना फोडण्यात भाजपला यश आलं. या निकालावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निकालावर बोलताना शरद पवार यांनी चक्क विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलं आहे.

अपक्षांना आपल्या बाजूने वळविण्यात भारतीय जनता पक्ष यशस्वी ठरला आहे. अपक्ष आमदार आपलीशी करण्यात विरोधी फडणवीस यांना यश आलं. राज्यसभा निकालाने मला कोणताही धक्का बसलेला नाही, असं शरद पवार म्हणाले.

महाविकास आघाडीच्या एकूण संख्येप्रमाणे मतदान झालं. तिन्ही पक्षातील एक मतंही फुटलं नाही. जी मतं फुटली आहेत ती अपक्षांची आहेत, शरद असं पवार म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

“निवडणूक केवळ लढवण्यासाठी नाही, तर जिंकण्यासाठी लढवली होती”

“मला टार्गेट का केलं जातंय याबद्दल काहीच माहीत नाही”

RajyaSabha Election Result | देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीला सर्वात मोठा धक्का!

“चंद्रकांत पाटलांनी हिमालयात जाऊन डोक्याला तेल लावावं”

पुढील दोन दिवसांमध्ये ‘या’ ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता; वाचा हवामान खात्याचा अंदाज

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More