अहमदनगर महाराष्ट्र

“यापुढे राज्यातील भाजप नेत्यांनी झेपेल तितकंच बोलावं”

अहमदनगर | राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची निवडणुक पार पडली. यात महाविकास आघाडीने दणदणीत विजय मिळवला आहे. तर भाजपला हार पत्करावी लागली आहे. यानंतर महाविकास आघाडीतील नेते आणि भाजप यांच्यात चांगलीच जुंपली आहे.

राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निकालावरून राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी भाजपवर निशाणा साधलाय. त्यांनी या संदर्भात ट्विट केलं आहे.

राज्यातील भाजप नेत्यांनी झेपेल तितकंच बोलावं, असा सल्ला राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी भाजप नेत्यांना दिला आहे. उगाच कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्याच्या फंदात कार्यकर्त्यांचं मानसिक खच्चीकरण कराल, असा टोलाही तनपुरे यांनी भाजप नेत्यांना लगावलाय.

विधानपरिषदेच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी घवघवीत मते मिळवत विजयरथ खेचून आणला आहे. मतांच्या माध्यमातून सुजाण नागरिकांनी महाविकास आघाडीवर असलेल्या विश्वासावर शिक्कामोर्तब केला आहे. आता यापुढे राज्यातील भाजपच्या नेत्यांनी झेपेल तितकंच बोलावं, असं प्राजक्त तनपुरे म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या-

शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी बच्चू कडू दुचाकीवरून दिल्लीकडे रवाना!

प्रताप सरनाईकांनी चौकशीला हजर होण्यासाठी ‘ईडी’कडे मागितली इतक्या दिवसांची मुदत

गाडी घेताना एक रुपयाही भरण्याची गरज नाही; या कंपनीनं आणलीय भन्नाट ऑफर!

रेखा जरे हत्याप्रकरण; आरोपी बाळ बोठेविरोधात लूकआऊट नोटीस जारी

पुण्यातील वाहनचालकांना मोठा दिलासा; पुणे महापालिकेनं घेतला हा मोठा निर्णय!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या