Prajakta Mali | मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) ही नेहमी चर्चेत असते. ती एक उत्तम अभिनेत्री असून एक उत्तम सूत्रसंचालन देखील करते. प्राजक्ता माळीने (Prajakta Mali) आज मुंबईमध्ये पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावला आहे. याआधी तिने पुण्यात मतदानाचा हक्क बजावला होता. मात्र आता तिने मुंबईमध्ये मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी तिने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्या पोस्टची जोरदार चर्चा आहे.
प्राजक्ता माळीकडून मतदानाचं आवाहन :
प्राजक्ता माळीने (Prajakta Mali) मतदान केल्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. सध्या प्राजक्ताच्या फोटोची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. तिने आज सर्व नागरिकांना मतदानाचे आवाहन केलं आहे. सध्या प्राजक्ता माळीच्या फोटोची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. तसेच जो मतदान करणार नाही तिला तिने प्राजक्ता माळी (Prajakta Mali) स्टाईलने सभ्य भाषेत सुनावलं आहे.
प्राजक्ता माळी हिने आधी मतदानाचं कर्तव्य बजावा, मग आपली कामं करा असं आवाहन नागरिकांना केलं आहे. जर आपल्या आसपासचं जर कोणी मतदान करत नसेल तर त्याला मतदान करायला भाग पाडा, असं प्राजक्ता माळीने आपल्या सोशल मीडियाच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. तसेच मतदान केलं का?.. असा प्रश्न लोकांना विचारा, तसेच जे म्हणतील मतदान केलं नाही त्यांना अपराध वाटेल अशी सभ्य वागणूक द्या, असं प्राजक्ताने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
प्राजक्ता माळीची पोस्ट जशीच्या तशी :
आधी मतदान मग बाकीचे काम मी माझं कर्तव्य बजावलं, तुम्ही? (मुंबईकर, आज हा प्रश्न प्रत्येकाला विचारा; ज्याचं उत्तर नाही येईल त्याला guilt येऊन तो त्वरित मतदानास जाईल अशी ‘सभ्य’ वागणूक द्या.) आपलं पुढील ५ वर्षांसाठीचं भविष्य निश्चित करा. मतदान करा. यंत्रणा आपल्या प्रतिक्षेत आहे. (आत्तापर्यंत पुण्यात मतदान करत आले; मुंबानगरीतील हे पहिलं मतदान.)
View this post on Instagram
प्राजक्ता माळी ही एक संवेदनशील अभिनेत्री आहे. ती विविध मुद्द्यांवर आपलं मत मांडताना दिसते. आता ही तिने मतदान करण्यावर भाष्य केलं आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट केली आहे. आधी मतदान आणि मगच फरसणार नेटकरी म्हणाला आहे.
मुंबईतील सहा मतदारसंघ, कल्याण, ठाणे, भिवंडी, पालघर, नाशिक, दिंडोरी, धुळे या आज मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. यामुळे नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केलं जात आहे. सेलिब्रिटी रांगा लावून मतदानाचा अधिकार बजावत आहेत.
News Title – Prajakta Mali First Vote In Mumbai Social Media On Post Viral
महत्त्वाच्या बातम्या
“…वयस्कर मतदार प्रतीक्षा करून घरी परतत आहेत”, ईव्हीएम मशीन बंद असल्याने आदेश बांदेकरांचा संताप
कल्याण लोकसभा मतदारसंघात मतदारांचा उडाला गोंधळ
नाद एकच…फक्त बैलगाडा शर्यत, बैलगाडा प्रेमींसाठी मोठी अपडेट
पुण्यात दोघांना चिरडणाऱ्या बिल्डरच्या मुलाला जामीन; मृतांच्या नातेवाइकांकडून संताप
“सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करण्याबाबत डील झाली होती”, राष्ट्रवादीच्या नेत्याचा मोठा गोप्यस्फोट