“आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ नये”; प्राजक्ता माळीची नवी पोस्ट चर्चेत

Prajakta Mali

Prajakta Mali l ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) सोशल मीडियावर (Social Media) नेहमीच सक्रीय असते. नुकतीच तिने रस्ता सुरक्षेबाबत (Road Safety) जनजागृती करणारी एक पोस्ट शेअर केली आहे, जी सध्या चर्चेत आहे.

प्रादेशिक परिवहन विभागातर्फे (Regional Transport Department) दरवर्षी १ ते ३१ जानेवारी या कालावधीत ‘रस्ता सुरक्षा अभियान’ (Road Safety Campaign) राबवण्यात येते.

या अभियानांतर्गत प्राजक्ताने ठाण्यात (Thane) आयोजित करण्यात आलेल्या बाईक रॅलीला (Bike Rally) हिरवा झेंडा दाखवला. या अभियानाचे काही फोटो (Photos) तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या फोटोंसोबतच तिने चाहत्यांना वाहतुकीचे नियम (Traffic Rules) पाळण्याची कळकळीची विनंती केली आहे. “आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही, अशा पद्धतीने गाडी चालवली तर सगळेच सुरक्षित राहण्यास मदत होईल”, असे तिने म्हटले आहे.

Prajakta Mali l फोटोसाठी बाईकवर बसले, पण… :

प्राजक्ताने शेअर केलेल्या एका फोटोत ती बाईकवर (Bike) बसलेली दिसत आहे. मात्र, तिने हेल्मेट (Helmet) घातलेले नाही. याबद्दल स्पष्टीकरण देताना तिने तळटीपेत लिहिले आहे की, “फक्त फोटोसाठी बाईकवर बसलेय, वास्तविक मला अशा bikes चालवताच येत नाहीत. त्यामुळे मी हेल्मेट लावले नाही.” तसेच तिने “परवाह- care – काळजी” असा सल्लाही दिला आहे.

प्राजक्ताने शेअर केलेले नियम:

-दुचाकीस्वारांनी (Two Wheeler) (मागे बसलेल्या व्यक्तीने देखील) हेल्मेट (Helmet) वापरणे.
-चारचाकी वाहनांतील (Four Wheeler) प्रत्येकाने सीटबेल्ट (Seatbelt) वापरणे.
-मद्यपान (Alcohol) करून गाडी चालवू नये.
-गाडी चालवताना मोबाईलचा (Mobile) वापर करू नये.
-हॉर्नचा (Horn) कमीत कमी वापर करावा.
-अपघात (Accident) झाल्यास, जखमींना मदत करावी.

News Title : Prajakta Mali Social Media Post 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .