Prajakta Mali | मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी कायम कोणत्या न कोणत्या कारणावरुण चर्चेत असते. छोट्या पडद्यावरील जुळून येते रेशीमगाठी या मालिकेतून प्राजक्ताला घराघरातून प्रसिद्धी मिळाली. सोशल मीडियावर देखील प्राजक्ताची फॅन फॉलोइंग दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्राजक्ताने लाखो लोकांच्या मनात घर केलं आहे. प्राजक्ताच्या चाहत्यांना नेहमीच तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घ्यायला आवडतं.
लग्नाबदल खुलासा-
प्राजक्ताच्या (Prajakta Mali) चाहत्यांना प्राजक्ताच्या लग्नाची घाई लागलेली असते. अनेक मुलाखतीमध्ये प्राजक्ताला तु लग्न कधी करणार आहेस? असे प्रश्न विचारण्यात आले होते. मात्र, प्राजक्ताने अनेक वेळा या प्रश्नाचं उत्तर देण टाळलं. दरम्यान, एका मुलाखतीमध्ये प्राजक्ताला पुन्हा हा प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा प्राजक्ताने यावर मौन सोडलं आणि यावर ती म्हणली की, दु:ख आयुष्यात येणार असेल तर मी लग्न नाही करणार.
View this post on Instagram
पुढे काय म्हणाली?
बोलत असताना प्राजक्ता म्हणाली की, माझ्या आनंदात जर कुणी आणखी आनंद अॅड करणार असेल तर मी लग्न करेन. दु:ख आयुष्यात येणार असेल तर मी लग्न नाही करणार. डोक्या भुगा नको. डोक्याची मंडई होणार असेल तर मला लग्न नाही करायचं. पुढे ती म्हणाली (Prajakta Mali) की, मानसिक शांतता ही माझ्या आयुष्याची प्राथमिकता आहे. जर डोकंच जागेवर नसेल तर काम करायला सुचणार नाही. त्यामुळे मानसिक शांतता फार गरजेची आहे, असं प्राजक्ता म्हणाली.