Top News महाराष्ट्र मुंबई

औरंगाबाद नाही तर ‘या’ जिल्ह्याला संभाजी महाराजांचं नाव द्या- प्रकाश आंबेडकर

मुंबई | औरंगाबादच्या नामांतरावरून सध्या राजकीय वातावरण पेटलं आहे. सत्तेत असलेल्या काँग्रेस पक्षाने औरंगाबादच्या नामकरणाला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे शिवसेना पेचात पडली आहे. अशातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

औरंगाबाद नाही तर पुणे जिल्ह्याला संभाजी महाराजांचं नाव द्या, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद आणि संभाजी महाराज यांचा थेट असा फारसा संबंध नाही. उलट संभाजी महाराज आणि पुण्याचं नातं असल्याचं आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

पुणे जिल्ह्यात संभाजी महाराजांवर अंत्यसंस्कार झाले आहेत. पुणे जिल्ह्यातील वडूज गावात त्यांची समाधी आहे. त्यामुळे संभाजी महाराजांचं स्मरण रहावं असं वाटत असेल तर पुणे योग्यभूमी असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, पाच वर्ष सरकारमध्ये असताना भाजप-शिवसेनेनं औरंगाबाद शहराचं नाव का बदललं नाही, असा सवालही आंबेडकरांनी केला आहे.

थोडक्यात बातम्या-

“शिवसेनेमुळेच काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळाले हे लक्षात ठेवा”

“सत्तेच्या भुकेपायी भाजप राज्यपालपदाची प्रतिष्ठा कमी करत आहे”

कोरोनावर मात करत ग्लोबल टिचर पुरस्कार विजेते डिसले गुरूजींनी दिला ‘हा’ कानमंत्र

ब्रिटनमध्ये आलेल्या नव्या कोरोनाचे रूग्ण आढळले महाराष्ट्रात, आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती

“कंगणा राणावतने भाजपला खुश करण्यासाठी महाराष्ट्राची बदनामी केली”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या