
नागपूर | कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा, अशी मागणी करणाऱ्या आमदाराच्या खात्यातच कर्जमाफीचे पैसे जमा झालेत. शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर यांच्या खात्यात पैसे जमा झाल्यानंतर त्यांनी ही बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.
प्रकाश आबिटकर यांनी बुधवारी शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा सभागृहात उपस्थित करत सरकारला जाब विचारला होता. तसेच तात्काळ रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी केली होती. त्याच्या दुसऱ्याच दिवशी आबिटकरांच्या खात्यावर कर्जमाफीचे 25 हजार रुपये जमा झाले. धक्कादायक बाब म्हणजे त्यांनी कर्जमाफीसाठी कुठलाही अर्ज केला नव्हता.
माझ्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा झाली असेल तर राज्यातील कर्जमाफीमध्ये घोटाळा झाला असेल, असा आरोप आबिटकर यांनी केलाय.