अकोला महाराष्ट्र राजकारण

लाॅकडाऊन हटवा नाहीतर…; प्रकाश आंबेडकरांकडून ‘डफली बजाव’ आंदोलनाचा इशारा

अकोला | केंद्र व राज्य सरकारकडून लाॅकडाऊन उठविण्याची कसलीही चिन्हं दिसत नाहीत. तसेच याकाळात नागरिकांना कसलीही सवलत द्यायलाही सरकार तयार नाही. यामुळे कामगारांची उपासमार अन् नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असल्याचं पहायला मिळतंय. याविरोधात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकरांनी ‘डफली बजाव’ आंदोलनाचा इशारा दिला आहे.

राज्यात एसटी सेवा बंद असल्यानं कामगारांची उपासमार होत आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही पुरती कोलमडलेली आहे. या बससेवा तात्काळ सुरू करण्यात याव्यात या प्रमुख मागणीला घेऊन राज्यातील एसटी डेपो व शहरातील सार्वजनिक बस डेपोसमोर दिवसभर डफडं वाजवून आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.

तसेच या आंदोलनात राज्यभरातील बाजार समिती, व्यापारी, रिक्षा, दुकानदार, फेरीवाले, लोहार, न्हावी, चांभार या संघटनांनीही सहभागी व्हावं, असंही आवाहन आंबेडकर यांनी यावेळेस केलं आहे.

दरम्यान लाॅकडाऊनला विरोध करण्याचा पवित्रा वंचित बहुजन आघाडीनं का घेतला आहे, हेदेखील या आंदोलनातून नागरिकांना पटवून देण्यात येणार असल्याची माहिती आंबेडकरांनी यावेळेस दिली. लाॅकडाऊनच्या काळात मजूर अन् कामगार वर्गाला मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत असल्यानं वंचित बहुजन आघाडी आता मैदानात उतरली असल्याचं पहायला मिळतं आहे.

महत्वाच्या बातम्या-

स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने देशात लोकशाही रूजवली, मात्र भाजपने…- बाळासाहेब थोरात

100 दिवसात ‘या’ देशामध्ये एकाही कोरोना रूग्णाची नोंद नाही; महिला पंतप्रधानाची कमाल!

“70 टक्के नवीन चेहऱ्यांना संधी दिल्यास काँग्रेसचे पुनरुज्जीवन शक्य”

मी सांगितलेलं कुठलंही काम देवेंद्र फडणवीसांनी केलं नाही असं होत नाही- नारायण राणे

चीनमधील ‘या’ महिलेला झालेला आजार पाहून सारं जग झालंय हैराण!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या