पुणे | सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरती कोलमडलेली असून बससेवा तत्काळ सुरू करण्यात याव्यात या प्रमुख मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांचं डफली बजाव आंदोलन नुकतंच पार पडलं. यावेळेस फक्त डफ घेऊन रस्त्यावर उतरलो मात्र सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू न झाल्यास हजारोंच्या संख्येनं रस्त्यावर उतरू, असा इशारा प्रकाश आंबेडकरांनी पुन्हा एकदा दिला आहे.
ट्विटरवरून राज्य सरकारला इशारा देताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ‘सार्वजनिक वाहतूक बंद ठेऊन किंवा अगदी कमी क्षमतेवर चालवण्यामागे यांचे खासगीकरण करून कर्मचाऱ्यांना सक्तीची निवृत्ती देण्याचा घाट घातला जात आहे .यावेळी फक्त डफ घेऊन आलो, पुढच्यावेळी हजारो लोकं असतील!’
मुंबईच्या बेस्ट व एसटी महामंडळाच्या कर्मचारी संघटनांसोबत आज प्रकाश आंबेडकर यांची बैठक पार पडली. राज्य सरकार सार्वजनिक वाहतूक सुरू करणार नसेल तर पुन्हा एकदा हजारोंच्या संख्येनं रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळेस दिला.
दरम्यान आंबेडकरांनी काल ब्रास बॅन्डचे मालक व कर्मचारी यांचीही भेट घेऊन समस्या जाणून घेतल्या. सामान्य माणसासाठी लॉकडाउन म्हणजे तोंड दाबून बुक्क्यांचा मार झालेला आहे. जनता फार काळ हा मार सहन करणार नाही आणि आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत हे सरकारने ध्यानात ठेवावं, असं मतही आंबेडकरांनी यावेळेस व्यक्त केलं होतं.
मुंबईच्या बेस्ट व एसटी महामंडळाच्या कर्मचारी संघटनांसोबत आज बैठक झाली.सार्वजनिक वाहतूक बंद ठेऊन किंवा अगदी कमी क्षमतेवर चालवण्यामागे यांचे खासगीकरण करून कर्मचार्यांना सक्तीची निवृत्ती देण्याचा घाट घातला जात आहे.यावेळी फक्त डफ घेऊन आलो,पुढच्यावेळी हजारो लोकं असतील! pic.twitter.com/msATIAjWyt
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) August 17, 2020
महत्वाच्या बातम्या-
‘संजय राऊत बोलले अन् वादळच आलं’; आव्हाडांकडून राऊतांची पाठराखण
प्रसिद्ध बास्केटबॉलपटू मायकल जॉर्डनचे बूट तब्बल इतक्या कोटींमध्ये विकले गेले!
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुन्हा एम्स रुग्णालयात दाखल
“शिवथाळीच्या यशानंतर ‘शिव दवाखाने’ येणार, डाॅक्टरांच्या ऐवजी कंपाउंडर असणार”
मुलाखतकारांनी विचारलं IAS का व्हायचंय? पण त्याक्षणी ‘तो’ वेगळंच काही बोलून गेला अन्…
Comments are closed.